Jeh Ali Khan: 'जेह अली खान'.. रणधीर कपूर यांच्याकडून सैफ-करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाला दुजोरा; अर्थ जाणून घ्या
बॉलिवूडचा दुसरा नवाब सैफ अली खान आणि बेगम करीना कपूर यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबद्दल बर्याच दिवसांपासून अनेक बातम्या ऐकायला मिळतात.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने 21 फेब्रुवारीला तिच्या दुसर्या मुलाला जन्म दिला. तेव्हापासून मुलाचा फोटो आणि त्याचे नाव याबद्दल चर्चा सुरू आहे. अलीकडेच बातमी आली होती की करीना आणि सैफने आपल्या दुसर्या मुलाचे नाव ठेवले आहे. अद्याप याला अधिकृतपणे दुजोरा मिळाला नसला तरी आता करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी याची पुष्टी केली आहे.
आजोबा रणधीर कपूर यांनी Kareena Kapoor च्या दुसऱ्या मुलाचा फोटो चुकून शेअर केला आणि....
करिनाचे वडील रणधीर यांनी या नावाला दिला दुजोरा
रिपोर्ट्सनुसार करीना आणि सैफ आपल्या धाकट्या मुलाला 'जेह' म्हणतात. त्याचवेळी कपूर कुटुंबातील कुणीतरी पहिल्यांदाच याला दुजोरा दिलाय. खरं तर, नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना रणधीर कपूरने सांगितले की, हो, करीना आणि सैफच्या धाकट्या मुलाचे नाव जेह आहे. त्याचवेळी हे नाव कधी ठेवले आहे असे जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, आम्ही एका आठवड्यापूर्वीच हे नाव फिक्स केलं होते.
View this post on Instagram
नावाचा अर्थ काय?
मिळालेल्या माहितीनुसार कपूर कुटुंबातील सर्व लोक बाळाला प्रेमाने जेह म्हणतात. जेह हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ ब्लू क्रेस्टेड बर्ड आहे. तर पारसीमध्ये या नावाचा अर्थ म्हणजे To come, to bring. हे नाव आता बदलले जाऊ शकते कारण अहवालानुसार धाकट्या नवाबच्या मन्सूर या नावावरही विचार केला गेला आहे, हे सैफच्या वडिलांचे नाव आहे. करीना आणि सैफच्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर आहे, ज्याचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला होता. त्याच्या नावाबाबत लोकांनी सोशल मीडियावरही प्रश्न उपस्थित केले होते.
करीना रिलीज केली प्रेग्नन्सी जर्नी बुक
अलीकडेच करीनाने तिच्या गरोदर प्रवासाविषयीचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्याने ही माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. या पुस्तकात करीनाने सांगितले आहे की ती गरोदरपणाच्या काही दिवसांत कामावर जाण्यास उत्सुक होती. मात्र, काही दिवस असे गेले की तिला अंथरुणावरुन उठताही येत नव्हते.