आजोबा रणधीर कपूर यांनी Kareena Kapoor च्या दुसऱ्या मुलाचा फोटो चुकून शेअर केला आणि....
ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री करीना कपूर हिचे वडील रणधीर कपूर यांनी आपल्या दुसऱ्या नातवाचा म्हणजेच करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच बी- टाऊनची बेगम म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान हिनं एका बाळाला जन्म दिला. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं हे दुसरं अपत्य. करीनानं बाळाला जन्म दिल्यानंतर सोशल मीडियापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत सर्वांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली ती म्हणजे करीनाच्या मुलाच्या फोटोची.
करीनाचा मुलगा नेमका दिसतो तरी कसा, याचीच उत्सुकता चाहत्यांना लागलेली असताना तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या नावे असणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करण्यात आला. हा फोटो व्हायरल होणार तोच, तातडीनं तो डिलीटही करण्यात आला.
स्क्रिनश़ॉट व्हायरल
रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या नातवाचा फोटो कोलाज पद्धतीनं पोस्ट केला. पण, त्यांनी बहुधा तो चुकून शेअर केला असावा. कारण लगेचच हा फोटो डिलीटही करण्यात आला. असं असलं तरीही नेटकऱ्यांनी क्षणार्धातच या फोटोचे स्क्रीनश़ॉट काढले आणि आता हा स्क्रीनश़ॉट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
करीनानंही शेअर केलेला मुलासोबतचा फोटो
खुद्द करीना कपूर खान हिनंही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या नवजात बाळासोबतचा फोटो पोस्ट केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं आपल्या बाळाला सर्वांच्याच भेटीला आणलं. पण, तरीही तिनं त्याचा चेहरा मात्र दाखवला नव्हता.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे Sooryavanshi ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
View this post on Instagram
करीनानं 21 फेब्रुवारीला दुसऱ्या बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच सैफ आणि करीना या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठीची उत्सुकता पाहायला मिळाली होती. आता कुठं त्याचा फोटो सर्वांच्या भेटीला आला होता, पण तोही सोशल मीडियावरुन मागे घेण्यात आला. त्यामुळं आता खुद्द करीनाच तिच्या बाळाची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला केव्हा आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.