एक्स्प्लोर
सैफची मुलगी हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार!
मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनसोबत सारा करिअरची सुरुवात करणार आहे.
दिग्दर्शक करण मल्होत्रा लवकरच कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. याच सिनेमातून सारा खान पदार्पण करणार असल्याचं कळतं.
मोठ्या मोठ्या अभिनेत्री हृतिक रोशनसोबत सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे हे वृत्त खरं असेल तर साराच्या अभिनय करिअरची सुरुवात दमदारच होईल.
करण मल्होत्राशी संबंधित एका सुत्राने सांगितलं की, करणच्या कॉमेडी सिनेमात सारा खान प्रमुख भूमिकेत असेल. चित्रपटाचं नाव अद्याप ठरवलेलं नाही. मार्च 2017 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
करण मल्होत्रा आणि हृतिक रोशनने याआधी 'अग्निपथ' चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement