सैफ प्रकरणात करिनाच्या भावनांचा कडेलोट, रागाच्या भरात इन्स्टाग्रामवर मन मोकळं केलं; म्हणाली कृपा करून..
Saif Ali Khan Attack : करिना कपूर चांगलीच संतापली आहे. तिने तिचा राग इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सध्या बॉलिवुडमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी या प्रकरानंतर चिंता व्यक्त केली आहे. सैफ अली खानच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे सैफ अली कान तसेच त्याची पत्नी करीना कपूर आणि त्यांची मुलं चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. असे असतानाच आता करीना कपूर चांगलीच भडकली आहे. तिच्या भावनांचा कडेलोट झाला असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
करीना कपूर नेमकं का संतापली?
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याचे वृत्तांकन केले जात आहे. तर दुसरीकडे पापाराझीदेखील सैफच्या कुटुंबावर नजर ठेवून आहेत. सैफच्या कुटुंबाशी निगडीत एखादी व्यक्ती दिसली की त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जात आहेत. सैफ-करिना कपूरच्या घरात लहान मुलांसाठी लागणारी खेळणी आणण्यात आली. त्याचेही फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. याचाच करीना कपूरला राग आला. तिने इन्स्टाग्रावर स्टोरी टाकून थेट आपला राग व्यक्त केला आहे. "कृपा करून आता हे सगळं काही थांबवा, आम्हाला एकटं सोडा. आम्हाला शांतीने जागू द्या" असा राग तिने व्यक्त केला.
लगेच स्टोरी डिलिट
विशेष म्हणजे करीना कपूरने अगोदर इन्स्टाग्रावरील स्टोरीच्या रुपात आपला संताप व्यक्त केल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत तिने ही स्टोरी डिलिट केली. त्यामुळे तिने स्टोरी डिलिट का केली? असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे. दुसरीकडे सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी लीलावती रुग्णालयाला भेट देत आहेत.
सैफ अली खानने प्रतिकार केला, पण...
तर दुसरीकडे सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. त्याने थेट सैफ आली खानच्या घरात घुसून हा हल्ला केला होता. हा आरोपी चोरीच्या उद्देशाने आला होता. सैफ अली खानने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यातच आरोपीने त्याच्यावर चाकूहल्ला केला. सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्यावर पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा :
वडिलांचं पुष्पा-2 ला हिट करण्यात मोठं योगदान, पण लेक राशा थडानीचं स्वप्न राहणार अधुरंच?
Prajakta Mali : फुलवंतीचा ग्लॅमरस लूक; थ्री पिस ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट!