एक्स्प्लोर

ब्रेकिंग! सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी, नामांकित कंपनीत नोकरीला

Saif Ali Khan Knife Attack : पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु होता. यामध्ये पोलिसांच्या हाती आता मोठी माहिती लागली आहे की, आरोपी बांगलादेशी घुसखोर आहे.

Saif Ali Khan Attacker Is Bangladeshi : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी असून त्याचं नाव विजय दास असल्याचं समोर आलं होतं. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर असून त्याचं नाव मोहम्मद असल्याचं कळतंय. या प्रकरणात दोन दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश आलं आहे.

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर

पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु होता. यामध्ये पोलिसांच्या हाती आता मोठी माहिती लागली आहे की, आरोपी बांगलादेशी घुसखोर आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अवैधरित्या भारतात वास्तव्यास होता. तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीनं वेशांतर केलं, नाव बदललं आणि तो ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये पोहोचला. या लेबर कॅम्पमधूनच पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

आरोपीचं भारतात अवैध वास्तव्य

आरोपी अवैधरित्या भारतामध्ये राहत होता, त्याने विजय असं नाव धारण केलेलं होतं. मोहम्मदने चोरीच्या उद्देशाने त्यांना सैफ अली खान वरती हल्ला केल्याची माहिती मिळते. आता हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोर असून भारतामध्ये अवैध वास्तव्य करत होता. त्याने सैफवर हल्ला केला आणि त्यानंतर तो ठाण्यामध्ये लेबर कॅम्पमध्ये परतला. याच लेबर कॅम्पमधून पोलिसांनी मोहम्मदला अटक केली.

आरोपी नामांकित कंपनीमध्ये नोकरीला

देशातील वेगवेगळ्या भागातून अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं जात आहे आणि त्यावर हल्ला करणारा आरोपी देखील बांगलादेशी घुसखोर असल्यास समोर आल्याने खळबळ माजली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्याची कासारवडवली हिरानंदानी पूर्व परिसरातून अटक करण्यात आली. या भागात तो एका नामांकित कंपनीमध्ये लेबरर म्हणून काम करत होता. नामांकित कंपनीत अशा व्यक्तीला कामावर ठेवण्यावरही आता प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं खरं नाव काय?

दरम्यान, आरोपीच्या नावाबाबत मोठा संभ्रम असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला आरोपीचं नाव विजय दास असून तो पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती होती. त्यानंतर तो बांगलादेशी घुसखोर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. यानंतर आरोपीची मोहम्मद आलियान, मोहम्मद एलियास आणि मोहम्मद सज्जाद अशी आरोपीची अनेक नावं समोर येत आहेत. आता त्याची खरी ओळख काय हे पोलिस तपासात समोर येईल.

मोठ्या कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये

पोलिसांना संशय आहे की, आरोपी अवैधरित्या भारतात आला असावा, कारण आधी त्याने त्याचं नाव विजय दास सांगितलं, पण नंतर त्याचं नाव मोहम्मद  आलियान असल्याचं समोर आलं. चौकशीमध्ये समोर आलं की, आरोपी एक कामगार असून तो एका मोठ्या कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये होता. तिथे तो काम करायचा. अशा मोठ्या कंपनीमध्ये हा व्यक्ती काम करतो आणि सैफ अली खानच्या घरी चोरी करुन पुन्हा लेबर कॅम्पमध्ये जातो, हे फार धक्कादायक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानवर 'लीलावती'मध्ये उपचार, रुग्णालयाचं बिल 35 लाख, इन्शुरन्स क्लेमचा आकडा समोर; 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Embed widget