Sai Tamhankar : बॉलिवूडमध्ये मराठमोळ्या सईच्या अभिनयाचा बोलबाला, अग्नी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस
Sai Tamhankar : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या अभिनयाची भुरळ सध्या बॉलिवूडलाही पडली आहे.
Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अग्नी या सिनेमातून पुन्हा एकदा सईने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे 24 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
सई ताम्हणकरसाठी 2024 हे वर्ष अनेक कारणांनी खास ठरलं. यामध्ये तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच, पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवूडमध्येही स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरत असल्याचं चित्र आहे.
अग्नी सिनेमातील सईची भूमिका
अग्नी सिनेमात सईने रुख्मिणी ही भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांनाही भावली असल्याचं पाहायला मिळतंय. इतकच नव्हे तर बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे.
अग्नी सिनेमातील सईच्या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत असल्याचं पाहायला मिळतंय. बॉलिवूड सोबतच मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नीचं कौतुक केलं. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.
सईचा सिनेप्रवास...
सईने मालिकांमधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. तिने तुझ्याविना, या गोजिरवाण्या घरात, कस्तुरी या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर तिने आमिर खानच्या गजनी या सिनेमातून मोठ्या पडद्यावर आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने सनई चौघडे, क्लासमेट्स, दुनियादारी, नो एन्ट्री, प्यारवाली लव्हस्टोरी, तु ही रे अशा सिनेमांमधून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर तिने हंटर, भक्षक, मिमी यांसारख्या बॉलीवूड सिनेमांमध्येही काम केलं. तसेच आता सईने तिच्या नव्या व्यावसायाची देखील सुरुवात केली आहे.
View this post on Instagram