Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
अभिनेत्री सई लोकूरनं (Sai Lokur) गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरनं (Sai Lokur) गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सईनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करुन तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सईच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सई लोकूरची पोस्ट
सई लोकूरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, "मुलीचे आगमन झाले आहे. ती निरोगी, सुंदर आहे आणि अनेकांना ती प्रिय आहे. या विशेष काळात तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत- साई आणि दीप". सईनं शेअर केलेल्या पोस्टला सुकन्या मोने, रेशम टिपणीस यांनी कमेंट करुन सई आणि तीर्थदीपला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
सई ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत होती, ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. सईनं तीर्थदीप रॉयसोबत 2020 मध्ये लग्नगाठ बांधली सई ही तीर्थदीपसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सईला इन्स्टाग्रामवर 324K फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
बिग बॉसमुळे मिळाली विशेष लोकप्रियता
सईनं बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधील सई, मेघा धाडे आणि पुष्कर जोग या तिघांच्या मैत्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या टॉप-5 स्पर्धकांपैकी एक होती.
सईनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम
सईनं कुछ तुम कहो कुछ हम कहे,पकडा गया, मिशन चॅम्पियन, प्लॅटफॉर्म, पारंबी ,आम्हीच तुमचे बाजीराव, कीस किसको प्यार करू या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सनम हॉटलाइन या वेब सीरिजमध्ये सईनं शिवानी ही भूमिका साकारली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
PHOTO : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री लुटतेय सुट्टीचा आनंद, शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो!