एक्स्प्लोर
Advertisement
#MeToo : कुक्कूचा गायतोंडेला पाठिंबा
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंह हिने तिच्या #MeToo स्टोरीमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनेकांनी निहारिकाला पाठिंबा दर्शवत नवाजवर टीका केली. परंतु नवाजची सेक्रेड गेम्समधली सहकलाकार कुब्रा सेटने मात्र नवाजला पाठिंबा दर्शवला आहे.
नावाज-निहारिकाचे प्रकरण पत्रकार संध्या मेनन यांनी जगासमोर मांडले. निहारिका म्हणाली की,‘एकदा मी नवाजला सकाळी माझ्या घरी नाश्त्यासाठी बोलावले होते. नवाज सकाळी घरी आला, मी दरवाजा उघडल्यावर नवाजने मला मिठित घट्ट पकडले. मी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सुरुवातीला मला ते शक्य झाले नाही. त्यानंतर काही वेळ आमच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर मी त्याच्या मिठीतून सुटले. मला कळत नव्हते की, आमच्या नात्याचे काय करावे. नवाज मला म्हणाला की माझे स्वप्न आहे की, परेश रावल आणि मनोज वाजपेयी यांच्याप्रमाणे माझी बायकोसुद्धा मिस इंडिया किंवा मोठी बॉलिवूड अभिनेत्री असावी’’. निहारिकाच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.
संबधित बातम्या : 'सेक्रेड गेम्स'चा गेम ओव्हर?
त्यानंत सेक्रेड गेम्समधील कुकू म्हणजेच कुब्रा सेट हिने नवाजला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे. तिने म्हटले आहे की, ''एक नाते तुटल्यानंतर दोघांमध्ये घडलेल्या घटना मीटू नाहीत. लोकांना मीटू आणि नातं या गोष्टींमधला फरक समजायला हवा, मी एक व्यक्ती म्हणून नवाजच्या सोबत आहे''.
''मी मान्य करते की, निहारिकाला इंडस्ट्रीमध्ये मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असेल. परंतु आपल्या निहारिकाने मीटूच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातला सूड उगावणे चुकिचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा लिंगभेद व्हायला नको.A relationship gone sour, isn’t #MeToo someone needs to recognise the toxic difference before we go picking sides. I stand by #NawazuddinSiddiqui or #Nowaz as a man.
— Kubbra Sait (@kubrasait) November 10, 2018
संबधित बातम्या : #MeToo च्या जाळ्यात अडकला नवाजुद्दीन, माजी मिस इंडियाचा आरोपI stand by the fact that although Niharika Singh may have had a tough time in the industry, categorising her once personal relationship as a #MeToo statement is incorrectly placed. We as humans are flawed. That isn’t gender specific.
— Kubbra Sait (@kubrasait) November 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement