(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oscars 2023 Live Telecast: गेल्या वर्षी टीका झाल्यानंतर ऑस्करचा मोठा निर्णय; यंदा 23 श्रेणीतील पुरस्कारांचे होणार थेट प्रक्षेपण
ऑस्कर (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यातील 23 श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय ऑस्करच्या आयोजकांनी घेतला आहे.
Oscars 2023 Live Telecast: ऑस्कर 2022 (Oscars 2023) च्या प्रसारणादरम्यान काही पुरस्कारांचे थेट-प्रक्षेपण न केल्यानं अनेकांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर टीका केली होती. आता या टीकेनंतर यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील 23 श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय ऑस्करच्या आयोजकांनी घेतला आहे.
पुरस्कार सोहळ्याचा वेळ वाचावा, यासाठी गेल्या वर्षी काही श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले नव्हते. त्यानंतर ऑस्करवर अनेकांनी टीका केली आता अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे सीईओ बिल क्रॅमर (Bill Kramer) यांनी पुरस्कारांच्या थेट प्रक्षेपणाबाबत मोठी घोषणा केली आहे.
बिल क्रॅमर यांनी सांगितले की, 2022 च्या पुरस्काराच्या थेट प्रक्षेपणामध्ये आठ श्रेणीतील पुरस्कार दाखवण्यात आले नव्हते. आता सर्व 23 श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
या श्रेणीच्या पुरस्कारांचे झाले नव्हते थेट प्रक्षेपण
2022 च्या पुरस्कार सोहळ्यात न दाखविलेल्या श्रेणींमध्ये मूळ स्कोअर, मेकअप, केशरचना, लघुपट, चित्रपट संपादन, उत्पादन डिझाइन, अॅनिमेटेड शॉर्ट, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट आणि साउंड या पुरस्कारांचा समावेश होता. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. हा पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये डॉन हडसन यांनी त्यांचा ऑस्करचे सीईओ या पदाचा कार्यकाल संपल्याची घोषणा केली. जूनमध्ये सर्वानुमते बिल क्रेमर यांची अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अँड सायन्सेसचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2022 मध्ये सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता आले होते. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला 'ऑस्कर पुरस्कार' मिळवून देऊ शकले. 'फॅन फेव्हरेट' असे या पुरस्काराचे नाव होते. सिनेप्रेमींना हे मतदान ट्विटरद्वारे करायचे होते. 2022 मध्ये कोडा सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता.
यंदा भारताकडून ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आला आहेत. तसेच ‘आरआरआर’ या चित्रपटाला एक-दोन नव्हे तर तब्बल 14 विभागांमध्ये नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Oscars Awards 2023 : अँड द ऑस्कर गोज टू... 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर