Don 3: डॉन-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट
'डॉन 3' (Don 3) या चित्रपटाबाबत निर्माते रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) यांनी मोठी अपडेट दिली आहे.
Don 3: बॉलिवूडमधील बदशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डॉन (Don) या चित्रपटाचे दोन भाग रिलीज झाले. यामधील डॉन (Don: The Chase Begins Again) हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला तर डॉन- द किंग इज बॅक (Don 2: The King Is Back) हा चित्रपट 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरुखनं प्रमुख भूमिका साकारली आहे. आता डॉन या चित्रपटाच्या तिसर्या (Don 3) भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'डॉन 3' या चित्रपटाबाबत निर्माते रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) यांनी मोठी अपडेट दिली आहे. दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याची माहिती आहे, निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे.
काय म्हणाले रितेश सिधवानी?
एका मुलाखतीमध्ये रितेश सिधवानी यांनी सांगितलं, 'जोपर्यंत माझा पार्टनर (फरहान अख्तर) चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या तो स्क्रिप्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. आम्ही सर्वजण डॉनला पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.'
डॉन चित्रपटाचे दोन्ही भाग ठरले सुपरहिट
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या दोघांचे एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आहे. या दोन्ही निर्मात्यांनी मिळून 1978 साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले. यानंतर 2006 साली डॉन चित्रपटाचा पहिला रिमेक प्रदर्शित झाला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. पाच वर्षांनंतर 2011 मध्ये डॉन 2 रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. हे दोन्ही चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते.
शाहरुख हा लवकरच जवान (Jawan) आणि डंकी (Dunki) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. जगभरात या चित्रपटानं जवळपास 1050 कोटींची कमाई केली. आता डॉन-3 मध्ये देखील शाहरुखच प्रमुख भूमिका साकारेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :