एक्स्प्लोर
राहुल गांधींच्या घराणेशाहीच्या टीकेमुळे ऋषी कपूर खवळले
कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढीला गुणवत्तेच्या बळावर जनतेने पसंती दिली आहे. 106 वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कपूर कुटुंबाने 90 वर्षांचं योगदान दिलं आहे.' असं ऋषी कपूर म्हणाले
मुंबई : बर्कलेमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय राजकारणातील घराणेशाहीचा दाखला दिला होता. मात्र या टीकेमुळे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर चांगलेच संतापले आहेत. कपूर कुटुंबातील प्रत्येक जण गुणवत्तेच्या जोरावर इथवर पोहचल्याचं ऋषी कपूर म्हणाले.
'कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढीला गुणवत्तेच्या बळावर जनतेने पसंती दिली आहे. 106 वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कपूर कुटुंबाने 90 वर्षांचं योगदान दिलं आहे.' असं ऋषी कपूर म्हणाले. 'देवाच्या दयेने आमच्या चार पिढ्या झाल्या. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर, रणबीर कपूर, चौघंही पुरुष.' असं पुढच्या ट्वीटमध्ये ऋषी कपूर म्हणाले.
https://twitter.com/chintskap/status/907640749511946241
https://twitter.com/chintskap/status/907642621580816385
https://twitter.com/chintskap/status/907645496335900672
बर्कलेत कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये झालेल्या भाषणात राहुल गांधींनी भारतातील घराणेशाहीवर वक्तव्य केलं होतं. कपूर कुटुंबाचा थेट उल्लेख राहुल गांधींनी केला नसला, तरी ऋषी कपूर यांचं पित्त खवळलं आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
'भारतातील बहुसंख्य पक्षांची हीच समस्या आहे. अखिलेश यादव हे घराणेशाहीतून आले. द्रमुकच्या करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन हेही त्याचं उदाहरण. इतकंच काय, अभिषेक बच्चनही घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये आहेत. अंबानी, इन्फोसिस यांचंही काही वेगळं नाही. अशाचप्रकारे भारतात काम चालतं. त्यामुळे माझ्या मागे लागू नका. ' असं राहुल गांधी म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ता : राहुल गांधी
गेल्या वर्षीही ऋषी कपूर काँग्रेस पक्षावर चांगलेच भडकले होते. गांधी कुटुंबावरुन रस्ते आणि इमारतींना काँग्रेसने नावं दिल्याची टीका केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.राहुल गांधी झोपेत होते की दारु प्यायले होते? : लोणीकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement