एक्स्प्लोर
बाप का माल समज रखा था?, गांधी कुटुंबावर ऋषी कपूर यांची आगपाखड

मुंबई : बॉलिूवड अभिनेते ऋषी कपूर पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. रस्त्यांपासून विमानतळ आणि फिल्म सिटीचं नाव गांधी कुटुंबाच्या नावावर ठेवल्याने ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. ऋषी कपूर यांच्या ट्वीटनुसार, "बहुतेक संपत्तीवर गांधी कुटुंबाचं नाव काय आहे? इंदिरा गांधी एअरपोर्टचं नाव गांधींच्या नावावर का आहे? याचं नाव भगत सिंह, आंबेडकरही ठेवता आलं असतं, किंवा ऋषी कपूरही." https://twitter.com/chintskap/status/732631430262448129 काँग्रेस सरकारच्या काढात गांधी कुटुंबावर ठेवलेली नावं बदलली जावीत. वांद्रे-वरळी लिंकचं नाव लता मंगेशकर किंवा जेआरडी टाटांच्या नावावर ठेवा. बाप का माल समज रखा है क्या? https://twitter.com/chintskap/status/732615084426432512 विचार करा, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, किशोर कुमार यांच्या नावावर आपल्या देशातील विविध ठिकाणांची नाव असू शकली असती, हा फक्त सल्ला आहे, असं ट्वीटही ऋषी कपूर यांनी केलं आहे. https://twitter.com/chintskap/status/732626814611283968 याशिवाय ऋषी कपूर यांना मुंबई फिल्म सिटीचं नावही खटकत आहे. त्यांनी लिहिलं आहे की, फिल्म सिटीचं नाव दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांच्या नावावर असावं. फिल्म सिटीचं नाव राजीव गांधी उद्योग का आहे, विचार करा. https://twitter.com/chintskap/status/732626814611283968 ऋषी कपूर म्हणाले की, "देशातील महत्त्वाच्या ठिकाणांचं किंवा भागाचं नाव अशा व्यक्तींच्या नावावर असावं, ज्यांनी देशासाठी काही योगदान दिलं असेल. प्रत्येक गोष्ट गांधींच्या नावे. मी सहमत नाही. जर दिल्लीचे रस्ते बदलू शकतात, तर संपत्तींना काँग्रेस सरकारने दिलेली नावं का बदलू शकत नाही. मी चंदीगडमध्ये होतो. तिथे पण राजीव गांधींची संपत्ती?" https://twitter.com/chintskap/status/732625668811300864 https://twitter.com/chintskap/status/732626814611283968
आणखी वाचा























