एक्स्प्लोर

भाई- व्यक्ति की वल्ली : वाह भाई वाह!

पुलंचं आयुष्य विस्तारलेलं आहेच. पण त्यांच्या आयुष्यात आलेल्या माणसांमुळे ते आणखी वलयांकित होतं. अतिरथी-महारथी त्यांच्या भवती होते. त्या प्रत्येकाची आपली अशी उत्तुंग प्रतिभा होती. म्हणूनच ही सगळी मंडळी जेव्हा सिनेमात येतात तेव्हा ते काम आणखी जबाबदारीचं होतं.

माणसाचं व्यक्तिमत्व जेवढ मोठं तेवढं त्याला सिनेमात बसवणं अवघड. त्यातही त्याला विविधांगी पैलू असतील आणि त्या सर्वच बाबतीत तो तितकाच प्रतिभावंत असेल तर त्याहून ते अवघड. म्हणजे, गैरसमज करुन घेणार नसाल तर अधिक सविस्तर सांगतो, समजा एखाद्या खेळाडूवर चित्रपट बनवायचा असेल तर तो तेवढ्यापुरताच होतो. तो खेळ आणि त्या खेळाडूचा स्ट्रगल आणि यश. हा असा मामला. पण समजा, पुलंसारखं व्यक्तिमत्व असेल तर? म्हणजे, हा माणूस उत्तम लेखक आहेच. त्यातलं त्याचं काम केवढंतरी मोठं आहे. पण त्यासोबत तो गातोही. तो सिनेमा दिग्दर्शकही आहे. अभिनेताही आहे. पेटीही वाजवतो. नाटकातही काम करतो.. अरे बापरे. तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वावर सिनेमा करायचा असेल तर काय करावं?  तर ते काम तितकंच अवघड आणि आव्हानात्मक होतं. पण विजय तेंडुलकर म्हणतात तसं, कुवतीपलिकडे टाकलेलं एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं. इतिहास रचतं. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'भाई- व्यक्ति की वल्ली' हा चित्रपट असंच शिवधनुष्य आहे. जे आयत्यावेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे पेललं आहे. आता प्रश्न पुढचा येतो, की कोणता तो निर्णय? तो निर्णय सिनेमाचे दोन भाग करण्याचा.
पुलंचं आयुष्य विस्तारलेलं आहेच. पण त्यांच्या आयुष्यात आलेल्या माणसांमुळे ते आणखी वलयांकित होतं. अतिरथी-महारथी त्यांच्या भवती होते. त्या प्रत्येकाची आपली अशी उत्तुंग प्रतिभा होती. म्हणूनच ही सगळी मंडळी जेव्हा सिनेमात येतात तेव्हा ते काम आणखी जबाबदारीचं होतं. या सिनेमातही अनेक मंडळी आहेत. आपल्याला पुलंच्या लिखाणातून अमर झालेली अनेक मंडळी भेटतात. पण वेगळ्या नावाने. नाथा कामत, रावसाहेब, आण्णा कर्वे, चंपूताई या मंडळींसह आपल्याला वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गदिमा अशी मंडळी भेटतात. या सगळ्यांना गुंफून चित्रपट बनवण्यात आला आहे. याच्या दुसऱ्या भागात तर बाळासाहेब ठाकरे, भक्ती बर्वे, विजया मेहता, पंडित नेहरु अशी मंडळीही दिसणार आहेत. पण ते नंतर बोलू.
भाई.. चा पहिला भाग आहे तो पुलंच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यावर बेतलेला. म्हणून या सिनेमात सुनिताबाई आणि भाई यांच्यासह त्यांची आई जास्त दिसतात. पुलंच्या शालेय जीवनापासून सुरु झालेला प्रवास हा पुढे भीमसेन, वसंतराव आणि कुमार यांच्या मैत्रीपर्यंत येतो. या टप्प्यांमध्ये आपल्याला त्यांचं शालेय जीवन, काॅलेज, वैवाहिक स्थिती आणि पुढे कुटुंबातल्या घडामोडी दिसत जातात.
मोठ्या माणसावर सिनेमा करताना संबंधित व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी दाखवणं शक्य नसतं. पण केवळ असे प्रसंग ज्यातून त्यांचं व्यक्तिमत्व उभं राहणं आवश्यक आहे, ते निवडावे लागतात. पटकथा लिहिताना ते प्रसंग नेमके घेतल्याचा फायदा सिनेमाला होतो. अगदीच उदाहरणादाखल पुलंच्या लग्नचा प्रसंग असो, किंवा सुनिताबाईंना मागणी घालण्याचा प्रसंग असो. पुढे लग्नानंतर त्यांच्या आयुष्या आलेल्या वादळाचा एक प्रसंगही यात आहे. यामुळे केवळ पुलं नव्हेत तर सुनिताबाईंचं व्यक्तिमत्वही उभं राहतं. संवाद, छायांकन, वेषभूषा, रंगभूषा यांना दाद द्यायला हवीच.
पटकथा लिहिताना पुलंच्या चांगल्या बाजू दाखवल्या आहेतच. पण काही कौटुंबिक प्रसंगात नवरा म्हणून मुलगा म्हणून होणारं दुर्लक्षही यात अधोरेखित करण्यात आलं आहे. अर्थात सुनिताबाईंनी 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात ते लिहिलं आहेच. त्याचे काही संदर्भ यात दिसतात. पुलंच्या दोन्ही बाजू यात आल्यामुळे तो वास्तवदर्शी होतो. खरा वाटतो. दिग्दर्शकीय कौशल्य दिसतं ते इथं.
अभिनयाबाबत नाथा कामत (महेश मांजरेकर), अण्णा कर्वे (विद्याधर जोशी), वसंतराव (पद्मानाभ बिंड), भीमसेन (अजय पुरकर), कुमार (स्वानंद किरकिरे), आई (अश्निनी गिरी) आदी सर्वांनीच संयत आणि योग्य भूमिका निभावल्या आहेत. पुलंबद्दलच्या अनेक गोष्टी यातून उलगडल्या आहेत. आणि सरतेशेवटी सागर देशमुख आणि इरावती हर्षे. यांनी पुलं आणि सुनिताबाई यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सागर पुलंच्या भूमिकेत पाहणं हे सरप्राईज पॅकेज आहे.
संकलनाबाबत पटकथेत येणारे गदिमांचा प्रसंग, रावसाहेबांचा बेळगावचा प्रसंग आणि शेवट मात्र काहीसे खटकतात. गदिमा आणि पुलंचा प्रसंग चांगला वठला आहे. पण गदिमा आणि पुलंचे नातेसंबंध त्यात स्पष्ट होत नाहीत. रावसाहेबाचा प्रसंगही लांबलेला. तर सिनेमाचा शेवट अचानक होणारा. त्या शेवटानंतर उत्तरार्धात जो ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात काय असेल याचे संकेत देण्यात आले आहेत, त्यावरुन नव्या भागाची उत्सुकता वाढते.
एकूणात, सिनेमा जमला आहे. नव्या पीढीला पुलं कोण होते, ते प्रतिभावंत असले तरी कौटुंबिक पातळीवर ते कसे होते हे सगळं या भागात कळतं. अर्थात त्यांचा कॅनव्हास मोठा असल्यामुळे अमुक प्रसंग यात हवा होता किंवा तो का आहे, असं म्हणण्यात अर्थ नाही. ते व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहणं महत्वाचं. ते उभं राहतं. यात सगळं आहे. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत चार स्टार्स.
हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा.
भाई- व्यक्ति की वल्ली : वाह भाई वाह!

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget