एक्स्प्लोर

सुरेल, प्रेक्षणीय 'रेडू'

रेडू ही अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. या सिनेमातला काळ आहे, १९७० सालचा. म्हणजे, त्याकाळी टीव्ही तर नव्हतेच. पण नुकतेच बाजारात आले होते ते रेडिओ. महानगरांमध्ये रेडिओ लोकांना माहित होते, पण कोकणातल्या छोट्या छोट्या गावांत रेडिओबद्दल कमालीचं कुतूहल होतं. ते कुतूहल पकडून दिग्दर्शकाने गोष्ट गुंफली आहे.

सागर छाया वंजारी हा नवा दिग्दर्शक 'रेडू' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्याच्या या सिनेमाला राज्य सरकारचे पुरस्कार मिळाल्यामुळे या सिनेमाबद्दल उत्सुकता आहेच. शिवाय दिग्दर्शक म्हणून त्यालाही प्रतिष्ठेचा अरविंदम पुरस्कार मिळाला आहे. अशा दिग्दर्शकाचा नवा सिनेमा पाहणं हे कुतूहलाचं नसतं तरच नवल. या सिनेमाचा विषय, त्याची मांडणी त्यासाठी त्याने निवडलेले कलाकार आदी पाहता अत्यंत विचारपूर्वक त्याने या सिनेमाची मांडणी केली आहे हे लक्षात येतं. रेडू ही अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. या सिनेमातला काळ आहे, १९७० सालचा. म्हणजे, त्याकाळी टीव्ही तर नव्हतेच. पण नुकतेच बाजारात आले होते ते रेडिओ. महानगरांमध्ये रेडिओ लोकांना माहित होते, पण कोकणातल्या छोट्या छोट्या गावांत रेडिओबद्दल कमालीचं कुतूहल होतं. ते कुतूहल पकडून दिग्दर्शकाने गोष्ट गुंफली आहे. ही गोष्ट तातूची आहे. तातू आपल्या त्रिकोणी कुटुंबात खुश आहे. रोजंदारीवर काम करुन तो कुटुंबाचं पोट भरतो. त्याची पत्नी छायाही त्याला मदत करते. परिस्थिती फार बरी नसली तरी त्याचं रडं नाही. अशावेळी तातूकडे मुंबईचे पाहुणे येतात. त्यांनी आणलेला असतो रेडिओ. यानिमित्ताने गावात रेडिओ येतो आणि तातूची कॉलर ताठ होते. पुढे या रेडिओचा प्रवास कसा होतो, त्या रेडिओचं पुढे काय होतं हे सगळं या सिनेमातून मांडण्यात आलं आहे. छोटी गोष्ट घेऊन त्यात शक्यतो डिटेलिंग करण्याकडे या दिग्दर्शकाचा कल आहे. तातूची भाषा, त्याची देहबोली, त्याचे कुटुंबियांशी असलेले संबंध, गावाशी त्याची असलेली नाळ, त्याच्या गरजा हे सगळं अत्यंत नेटकेपणाने त्याने मांडलं आहे. त्यासाठी त्याला उपयोग झाला आहे तो छायांकनाचा. कोकणातलं सौंदर्य या कॅमेऱ्याने टिपलं आहेच. शिवाय, कलाकारांचे हावभाव  टिपण्यातही या छायांकनाने बाजी मारली आहे. ही गोष्ट केवळ तातू आणि रेडिओपुरती मर्यादित नाही. तर ती त्यापलिकडे माणसांच्या स्वभावावर, माणूसकीवर भाष्य करते. म्हणून हा सिनेमा केवळ रंजन करत नाही तर जाता जाता आपण माणूसपणाबद्दल अभिमान वाटावा असं काहीतरी देऊन जातो. पटकथाकाराचं हे यश आहे असं म्हणावं लागेल. शशांक शेंडे यांना आपण आजवर अनेक सिनेमांमधून पाहिलं आहे. अनेकदा त्यांचा ग्रामीण बाज आपण पाहिला. पण 'रेडू' पाहिल्याानंतर मात्र त्यांच्यातल्या कलाकाराची कुवत दिसते. त्यांच्यासह छाया कदम यांचा अभिनयही लक्षात राहण्याजोगा. हा सिनेमा कोकणात घडतो. त्यामुळे त्या भाषेचा लहेजा कोकणी ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने विशेष मेहनत घेतली आहे. सर्वच लहान सहान कलाकारांनीही भूमिकेची गरज ओळखून आपलं योगदान दिलं आहे. केवळ गोष्ट न मांडता, त्या गोष्टी पलिकडे जाण्याचा दिग्दर्शकाचा ध्यास कौतुकास्पद आहे. समजायला अत्यंत सोपा, सहज असा हा सिनेमा आहे. तो आपण पाहायला हवा. या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळाला आहे रेड हार्ट.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget