एक्स्प्लोर

5 प्रियकर, लग्न करुनही आयुष्यभर एकटीच राहिली; रतन टाटांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लव्ह अफेअर्सनी अख्खी इंडस्ट्री गाजवली

Ratan Tata Ex Girlfrind Struggle Life : सिमी गरेवाल यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या की, एकीकडे त्यांची बॉलिवूडमधील कारकीर्द समोर येते. पण, त्यासोबतच त्यांच्या कथित 5-5 अफेअर्सच्या चर्चाही कानी पडतात.

Ratan Tata Ex Girlfrind Struggle Life : रतन टाटा (Ratan Tata) यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या जाण्यानं अख्खा देश हळहळला. देशभरात रतन टाटा यांच्या कारकिर्दीचीच चर्चा रंगली होती. त्यासोबतच एकीकडे चर्चा रंगलेली ती, रतन टाटा आणि त्यांची एक्स गर्लफ्रेंड सिमी गरेवाल यांची. सिमी गरेवाल म्हणजे, 'द लेडी इन व्हाईट'. 60-70 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री असलेल्या सिमी गरेवाल (Simi Garewal) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. आजही हे नाव बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेत्रींच्या यादीत आवर्जुन घेतलं जातं. 

सिमी गरेवाल यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या की, एकीकडे त्यांची बॉलिवूडमधील कारकीर्द समोर येते. पण, त्यासोबतच त्यांच्या कथित 5-5 अफेअर्सच्या चर्चाही कानी पडतात. सिमी गरेवाल यांच्या एक्स बॉयफ्रेंड्समध्ये रतन टाटा यांच्या नावाचाही समावेश होतो. रतन टाटांसोबतचं अफेअरनंतर दोघांनी त्यांच्यातली मैत्री जपली. पण अखेर सिमी गरेवाल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्या पतीपासून विभक्त झाल्या आणि सध्या एकाकी आयुष्य जगतायत. 

गडगंज श्रीमंत असूनही आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे रतन टाटा आता आपल्यात नाहीत, त्यांची उणीव कुणीच भरुन काढू शकणार नाही. त्यांच्या कुटुंबापासून ते त्यांच्या लव्ह लाईफबाबत 

असंख्य भारतीयांनी आपल्या मनात  रतन टाटा आता या जगात नाहीत. आपल्या उणीवा कोणीही पूर्ण करू शकत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या कुटुंबापासून त्याच्या लव्ह लाईफपर्यंतच्या गोष्टी जगाला माहीत आहेत आणि वाचल्या आहेत, पण तुम्हाला त्याच्या मैत्रिणीच्या लव्ह लाईफबद्दल माहिती आहे का? बॉलीवूडची ती सुंदरी, जिला 'द लेडी इन व्हाईट' असे नाव देण्यात आले.

जगाची पर्वा न करणाऱ्या या अभिनेत्रीनं 50 वर्षांपूर्वी असे बोल्ड सीन्स दिले होते की, अख्खी इंडस्ट्री हैराण झाली होती. सिमी गरेवाल म्हणजे, निखळ सौंदर्याची खाण... पण त्या सौंदर्यासोबतच सिमी नेहमीच पडद्यावर एलिगेंट आणि डीसेंट दिसल्या. पण, तुम्हाला माहीत आहे का की, अगदी लहान वयातच त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या होत्या. इंग्लंडमधून शिक्षण घेतलेल्या आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या सिमी गरेवाल अनेकांना आपल्या प्रेमात पाडायच्या. वयाच्या अवघ्या  पाचव्या वर्षी एका दिग्गज अभिनेत्यावर त्यांचा जीव जडला होता. आणि ज्यावेळी त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं, त्यावेळी त्याच अभिनेत्यासोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. 

'द लेडी इन व्हाइट' सिमी गरेवाल... 

'द लेडी इन व्हाइट' सिमी गरेवाल यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटांपासून केली नाही. 'टारझन गोज टू इंडिया' या इंग्रजी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सिमीचा जन्म 17 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. लुधियाना येथे जन्मलेल्या सिमीचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आणि तिचं शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झालं. असं म्हणतात की, सिमी यांची आई खूप सुंदर होती आणि त्यांच्यामुळेच सिमी यांना सौंदर्याचं वरदान लाभलं होतं.

वयाच्या 5 व्या वर्षी सिमी गरेवाल यांनी राज कपूरचा आवारा हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर तिला चित्रपटात करिअर करण्याचं व्यसन लागलं. सिमी यांना अभिनयात करिअर करायचं होतं, पण त्यांच्या वडिलांना ते मान्य नव्हतं. सिमी स्वभावानं हट्टी होत्या आणि तिच्या जिद्दीला मान्यता मिळावी, म्हणून तिनं उपोषण केलं. मुलीच्या हद्दापुढे वडिलांचं काही चाललं नाही आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्या मुंबईत आल्या.

'मेरा नाम जोकर'मधून मोठा ब्रेक मिळाला 

चित्रपट मिळत होते, पण बी ग्रेड चित्रपट किंवा मोठ्या चित्रपटांमध्ये साईड रोल्स... याचदरम्यान, सिमी गरेवाल यांना सर्वात मोठा ब्रेक मिळाला, तो 'मेरा नाम जोकर' चित्रपटामुळे. चित्रपटातील सिमी यांची भूमिका फारशी मोठी नव्हती, पण प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी होती. मिस मेरीची भूमिका साकारण्यासाठी सिमीनं खूप प्रयत्न केले. या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत काम करण्यासाठी सिमी यांनी खूप मेहनत घेतली होती. 

दरम्यान, मेरा नाम जोकर चित्रपटात काम करण्यासाठी सिमी यांनी राज कपूर यांचा नंबर मिळवला. नंतर खोट्या नावानं राज कपूर यांच्याशी बोलल्या. एक दिवस राज कपूर यांनी त्यांना चर्चच्या गेटवर भेटायला बोलावलं. त्यावेळी  राज कपूर यांना इम्प्रेस करण्यासाठी सिमी लाल गुलाब आणि स्वतः लिहिलेली कविता घेऊन गेल्या होत्या. 

तिसऱ्यांदा प्रेमात पडल्यावर थेट लग्न केलं, पण ते फार काळ टिकलं नाही

सिमी गरेवाल यांनी एका मुलाखतीत बोलताना खुलासा केलेला की, वयाच्या 17व्या वर्षी त्या पहिल्यांदा प्रेमात पडल्या. त्यांचं हे नातं तीन वर्ष टिकलं. यानंतर ती मन्सूर अली खान पतौडी यांच्या प्रेमात पडल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकांत बुडाले होते. दोघेही लग्न करणार होते, पण तेवढ्यात शर्मिला टागौर यांची भेट झाली आणि दोघांच नातं तुटलं. ज्यावेळी तिसऱ्यांदा सिमी गरेवाल प्रेमात पडल्या त्यावेळी त्यांनी थेट लग्नच केलं. 1970 मध्ये त्यांनी रवी मोहन यांच्याशी विवाह केला. 

सिमी गरेवाल आणि रवी मोहन यांचं लग्न केवळ 3 वर्ष टिकलं, हे नातं तुटलं, पण 10 वर्षांनी एकमेकांमधील मतभेद निवळले. सिमी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "रवी मोहन एक चांगला माणूस होता, आम्ही दोघे एकमेकांशी एकनिष्ठ होतो, पण देवाने आम्हाला एकमेकांसाठी बनवलंच नव्हतं. आम्ही वेगळे झालो पण अजूनही कुटुंबाच्या जवळ आहोत."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ते म्हणतात तू गेलास, तुझं नुकसान सहन करणं खूप कठीण; रतन टाटांच्या जाण्यानं एक्स गर्लफ्रेंडच्या भावनांचा बांध फुटला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 17 March 2025Aurangzeb Kabar News | कुठे आंदोलन? कुणा-कुणाचा विरोध ?; औरंगजेबाच्या कबरवरुन राज्यात घमासन, संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
Embed widget