एक्स्प्लोर

Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "तो' माझा सगळ्यात मोठा समर्थक"; विजय देवरकोंडाच्या प्रेमात आकंठ बुडाली रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna On Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. दरम्यान अभिनेत्रीने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Rashmika Mandanna on Vijay Devarakonda : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) 'अॅनिमल' (Animal) सिनेमा रिलीज झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. तसेच लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असल्याचीही चर्चा होती. दरम्यान आता अभिनेत्रीच्या एका वक्तव्यानंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत.

रश्मिका मंदाना तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अनेक दिवसांपासून तिचं नाव अभिनेता विजय देवरकोंडासोबत (Rashmika Mandanna Vijay Devarakonda Relation) जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या रंगल्या होत्या. पण नंतर ती अफवा असल्याचं समोर आलं. पण आता अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

रश्मिका मंदानाने केलं विजय देवरकोंडाचं कौतुक

रश्मिका मंदानाने नुकतचं एका मुलाखतीत विजय देवरकोंडाचं कौतुक केलं आहे. 'वी आर युवा'ला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली,"विजू आणि मी एकत्र मोठे झालो आहे. आयुष्यात कोणतीही मोठी गोष्ट करण्याआधी मी विजयचा सल्ला घेते. मुद्द्यावर बोलायला त्याला आवडतं. तो जास्त विचार करत बसत नाही. थेट बोलायला त्याला आवडतं. तो माझा सगळ्यात मोठा समर्थक आहे. वैयक्तिकरित्या तो मला पाठिंबा देत असतो. त्याच्यासारखा पाठिंबा मला आजवर कोणीच दिलेला नाही". 

रश्मिका-विजयच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा सुरुवात

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पण अद्याप दोघांनीही त्यांचं नातं जगजाहीर केलेलं नाही. रश्मिका आणि विजय लिव्ह-इनमध्ये असल्याच्याही चर्चा होत्या. 

काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं होतं की,"रश्मिका आणि विजयला त्यांचं नातं अधिकृत करायचं नाही. सध्या ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप त्यांनी लग्न किंवा साखरपुडा करण्याचा विचार केलेला नाही. सध्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे". 

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची पहिली भेट 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या सिनेमाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. 

रश्मिका-विजयच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या (Rashmika Mandanna Vijay Devarakonda Movies)

रश्मिकाचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील तिची गीतांजलीची भूमिका चांगलीच गाजली. तिचा 'पुष्पा : द रूल' (Pushpa 2) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे विजय देवरकोंडाचा 'खुशी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

संबंधित बातम्या

Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "फेब्रुवारीत साखरपुडा अन् लग्न"; रश्मिका मंदानासोबतच्या नात्याच्या बातम्यांवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Embed widget