Rapchik Kolinbai : 'रापचिक कोळीणबाई' गाण्यात अमृताची नखरेल अदा
अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ (Surya) या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.
‘रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अमृताचा नखरेल अंदाज पहायला मिळणार आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान यांनी लिहिलेल्या गाण्याला देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 6 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल’ असा विश्वास अमृताने व्यक्त केला.
‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. साहसदृश्ये अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस यांची आहेत. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. सध्या 'रापचिक कोळीणबाई' या गाण्याला पसंती मिळत आहे.
पाहा गाणं:
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Surya Marathi Movie: ‘सुर्या’ च्या विरोधात खलनायकांची फौज; 'हे' कलाकार साकारणार व्हिलनची भूमिका