एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Surya Marathi Movie: ‘सुर्या’ च्या विरोधात खलनायकांची फौज; 'हे' कलाकार साकारणार व्हिलनची भूमिका

‘सुर्या’ या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा, हेमंत बिर्जे, हॅरी जोश, उदय टिकेकर, गणेश यादव हे कलाकार खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

Surya Marathi Movie: चित्रपटात मुख्य नायक - नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी ‘सुर्या’ (Surya) या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा, हेमंत बिर्जे, हॅरी जोश, उदय टिकेकर, गणेश यादव ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून ‘सुर्या’ला बेजार करताना दिसतील. प्रसाद मंगेश हा युवा अभिनेता आपल्याला ‘सुर्या’च्या डॅशिंग भूमिकेत पहायला मिळणार आहे.

राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 6 जानेवारीला नवीन वर्षारंभी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

समाजात दहशत पसरवित, क्रौर्याचे दर्शन घडवित हातातल्या सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या खलनायकांना ‘सुर्या’ कसा समोरा जातो? याची जिगरबाज कथा ‘सुर्या’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते अखिलेन्द्र मिश्रा यात ‘नारूअण्णा’ या कुविख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रज्जाक’ या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वातील डॉनची भूमिका हेमंत बिर्जे यांनी साकारली आहे. त्यासोबत हॅरी जोश हे ‘मुन्ना रेड्डी’ या डॉनच्या व्यक्तिरेखेत दिसतील. उदय टिकेकर हे तात्या पाटील या विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेत पहायला मिळणार असून उदयसिंह मोरे ही खाकी वर्दीतल्या खलनायकाची भूमिका अभिनेता गणेश यादव यांनी साकारली आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि कौशल-मोझेस आहेत.

चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.

‘सुर्या’ या सगळ्या खलनायकांचा कसा प्रतिकार करतो हे आपल्याला 6 जानेवारीला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळालाkonkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, सरकरार स्थापन होण्यापूर्वीच मागणीSanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्नRamdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget