(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oscars 2025 : 'लापता लेडीज' की 'स्वातंत्र्यवीर सावरकर', कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड? सत्य जाणून घ्या
Swatantrya Veer Savarkar Film in Oscars Race : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट ऑस्कर 2024 साठी अधिकृतपणे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Savarkar Movie in Oscars Race : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'लापता लेडीज' चित्रपटानंतर आता आणखी एका भारतीय चित्रपटाने ऑस्करमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. रणदीप हुड्डा याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हे चित्र फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर पुरस्कार 2025 साठी सादर केला आहे. 'लापता लेडीज' चित्रपट ऑस्कर 2024 मध्ये भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात येत असल्याची घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) केली आहे . पण मंगळवारी रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमाही ऑस्करला जाणार असल्याची बातमी आली. यानंतर आता चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
प्रत्येक देशाकडून फक्त एकच चित्रपट निवडून ऑस्करसाठी पाठवला जातो, त्यामुळे आता या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट ऑस्करसाठी जाणार याबाबत चित्रपट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटांच्या निर्मात्यांपैकी एक संदीप सिंह यांनी मंगळवारी सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केले ज्यावर 'ऑस्कर 2024 साठी अधिकृतपणे सबमिट' असं लिहिलं होतं. या पोस्टरवर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचेही छोट्या अक्षरात आभार मानले गेले. या पोस्टमुळेच चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
संदीप सिंह यांनी काय म्हटलंय?
संदीप सिंह यांनी पोस्टसोबत दोन फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'आमच्यासाठी ही खूप सन्मानीय बाब आहे. आमचा 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्करसाठी अधिकृतपणे सादर झाला होता. यासाठी आम्ही भारतीय फिल्म फेडरेशनचे आभारी आहोत. हा प्रवास आमच्यासाठी खरोखरच अनमोल आहे आणि या काळात ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.'
View this post on Instagram
29 चित्रपटांमधून एका चित्रपटाची निवड
ऑस्करसाठी भारतीय फिल्म फेडरेशनला सादर करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटाचाही समावेश होता. रणदीप हुडाचा 'स्वातंत्र वीर सावरकर' चित्रपटही फेडरेशनला सादर करण्यात आला होता. संदीप सिंह यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये हीच माहिती दिली आहे. भारतीय फिल्म फेडरेशनकडे एकूण 29 चित्रपटांची यादी जमा करण्यात आली होती. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश होता. त्यातूनच 'लापता लेडीज' चित्रपटाची फेडरेशनने ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून निवड केली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :