Masai Mara Trip: रणबीरने आलियाला ‘या’ सुंदर ठिकाणी केला होता लग्नासाठी प्रपोज! करण जोहरच्या शोमध्ये उलगडलं रहस्य...
Masai Mara Trip: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7'मध्ये आलिया भट्टने तिच्या आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) रोमान्स आणि लग्नाशी संबंधित अनेक गुपिते उघड केली होती.
Masai Mara Trip: बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा (Karan Johar) बहुचर्चित शो 'कॉफी विथ करण'चा (Koffee With Karan) नवीन सीझन सुरू झाला आहे. करण जोहरच्या या शोमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोच्या सेटवर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गुपितेही उघड केली. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7'मध्ये आलिया भट्टने तिच्या आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) रोमान्स आणि लग्नाशी संबंधित अनेक गुपिते उघड केली होती. यावेळी आलियाने तिच्या प्रपोज विषयी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
करणच्या शोमध्ये सहभागी झालेल्या आलियाने पती रणबीरने तिला कसे प्रपोज केले, याविषयी माहिती दिली. रणबीर कपूरने आलियाला मसाई माराच्या जंगलात प्रपोज केले होते. ‘कॉफी विथ करण 7’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात आलिया भट्टने या सुंदर ठिकाणाची माहिती चाहत्यांना दिली.
मसाई मारा’च्या जंगलात केला प्रपोज
रणबीर कपूरने केनियामधील मसाई मारामध्ये आलिया भट्टला प्रपोज केले होते. हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये गणले जाते. मसाई मारा हे आफ्रिकेतील वन्यजीव संरक्षणाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे. या सुंदर जंगलात आफ्रिकन बिबट्या, सिंह, चित्ता आणि इतर अनेक वन्य प्राण्यांचा वास आहे. दूरवर पसरलेले मोकळे मैदान आणि तिथे मनसोक्त भटकंती करणारे वन्य प्राणी इथे येणाऱ्या प्रत्येकाला मंत्रमुग्ध करतात.
कसा होता ‘तो’ क्षण?
या शोमध्ये रणबीरच्या सरप्राईजबद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली की, ‘रणबीर कपूरने याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते आणि तो अचानक हातात अंगठी घेऊन आला. त्याने मला मसाई मारामध्ये प्रपोज केले. तिथे अनेक प्राणी भटकंती करत होते. आम्ही जिथे उभे होतो, ती जागा जरा भीतीदायक होती. पण, रणबीरने आमच्या गाईडला दुरूनच फोटो क्लिक करायला सांगितले होते.’
जगभरात प्रसिद्ध केनियाचे मसाई मारा जंगल!
केनियाच्या मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्यात झेब्रा, हरण, चिंकारा, हत्ती, चित्ता इत्यादी प्राणी आढळतात. हे ठिकाण आफ्रिकन सफारीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे 500 सिंह वास्तव्य करतात. हे ठिकाण दक्षिण-पश्चिम केनियामध्ये सुमारे 580 चौरस मैलांच्या परिसरात पसरलेले आहे. त्याची दक्षिण सीमा केनिया-टांझानिया सीमेला लागून आहे. या ठिकाणाहून मारा नदी वाहते. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी येतात.
हेही वाचा: