Ramayana : 'रामायण' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर! 'या' दिवशी सुरू होणार शूटिंग
Ramayana : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच त्याच्या आगामी 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईत या सिनेमाचा सेट तयार करण्यात आला आहे.
Ramayana Shooting : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह सनी देओल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे. सिनेमाच्या स्टारकास्टबाबत अनेक नवीन नावे समोर येत आहेत. अशातच आता या सिनेमाच्या स्टारकास्टबाबत नवी माहिती समोर आली आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
रणबीर कपूर शूटिंगपासून दूर
'रामायण' चित्रपटासाठी मुंबईत खास सेट तयार करण्यात आला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 2 एप्रिल 2024 रोजी मुंबईत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. फिल्म सिटीमध्ये गुरुकुलचा सेट तयार करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी आणि त्यांची टीम 2 एप्रिल 2024 रोजी मुंबईत रामायण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. फिल्म सिटीमध्ये बनवण्यात आलेल्या खास सेटवर या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. बालकलाकारांपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि भरत यांच्या भूमिकेसाठी बालकलाकारांना विचारणा झाली आहे. त्यामुळे सध्या तरी रणबीर कपूर या सिनेमापासून दूर आहे.
'रामायण' चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचा रणबीर कपूर भाग नसणार आहे. 3D स्कॅनच्या अंतिम फेरीसाठी रणबीर कपूर पुढील आठवड्यात लॉस एंजेलिसला जाणार आहे. पोस्ट प्रोडक्शन राऊंडमध्ये या अंतिम फेरीचा वापर करण्यात येईल. एप्रिलच्या मध्यापर्यंत रणबीर कपूर 'रामायण' सिनेमाची टीम जॉईन करेल. दिवाळी 2025 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल,असे म्हटले जात आहे.
रणबीरने सोडलं नॉन-व्हेज (Ranbir Kapoor Stop Drinking Alcohol And Eating Meat)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारीची एक टीम फक्त डिक्शन आणि डायलॉगवर काम करणार आहे. तसेच या सिनेमातील कलाकारांच्या कॉस्ट्यूमवरदेखील काम सुरू आहे. रणबीर कपूर या सिनेमावर खूपच मेहनत घेताना दिसून येत आहे. प्रत्येक डायलॉगवर तो रिसर्च करत आहे. 'रामायण' या सिनेमावर काम सुरू केल्यापासून प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना रणबीरने दारू आणि नॉन व्हेजचा त्याग केला आहे. रणबीरला रामाप्रमाणे पवित्र व्हायचं आहे. तसेच रात्रीच्या पार्टी करणंदेखील त्याने बंद केलं आहे.
'रामायण'साठी रणबीर घेतोय मेहनत (Ranbir Kapoor Training)
'रामायण' सिनेमासाठी रणबीर कपूरने खास ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. रणबीरचा एक फोटो (Ranbir Kapoor Viral Photo) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो इंटेस मोडमध्ये दिसून येत आहे. हेडस्टँड करताना तो दिसून येत आहे. डोक्यावर उभं राहणं हा व्यायामप्रकार रणबीरने पहिल्यांदाच केला आहे. रणबीरच्या ट्रेनरने त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर ब्लॅक शॉट्स आणि फुल स्लीव्हस टी-शर्टमध्ये दिसत आहे. वर्कआऊट करतानाचा रणबीरचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या