Ram Kadam On Adipurush Movie: 'आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही'; राम कदमांचं ट्वीट, चित्रपटात देवदेवतांचं विडंबन झाल्याचा आरोप
आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन झालं आहे, असा आरोप राम कदम (Ram Kadam) यांनी केला आहे.
Ram Kadam On Adipurush Movie: आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटावर आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी टीका केली आहे. 'हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.' असं ट्वीट राम कदम यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आदिपुरुष या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
राम कदम यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. तुटपुंजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.'
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
'चित्रपटाची दृष्य कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही.' असही राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिलं.
दृश्य काट छाट से काम नही चलेगा.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
ऐसी घिनोनी सोच को सबक सिखाने के लिये
इस प्रकार के कोई भी फिल्म को आजीवन पुरी तरह से #बॅन तथा जिम्मेदार लोगोको भी
पुरी तरह से इस इंडस्ट्री मे काम करनेसे कुछ साल #बॅन कर दिया जाय..
ताकी भविष्य मे कोई भी ऐसी हिम्मत ना करे..
आदिपुरुषच्या टीझरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: