![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ram Charan - Upasana : लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला राम चरण; उपासनासोबतचा फोटो व्हायरल
Ram Charan With Wife And Daughter : राम चरणच्या पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून लेकीला खुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडतानाचा अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Ram Charan - Upasana : लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला राम चरण; उपासनासोबतचा फोटो व्हायरल Ram Charan Upasana Ram Charan With Wife And Daughter First Photos of Ram Charan-Upasana’s baby girl: RRR star seen carrying newborn in arms after wife’s discharge Ram Charan - Upasana : लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला राम चरण; उपासनासोबतचा फोटो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/82c234aeab18f84b8ed8283ed780501d1687579282751254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ram Charan With Wife And Daughter : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि उपासना (Upasana) सध्या चर्चेत आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर उपासनाने एका गोड मुलीला जन्म दिलं आहे. उपासनाला 19 जूनला हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर 20 जून 2023 रोजी त्यांना कन्यारत्न झाले.
लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला राम चरण (Ram Charan With Wife And Daughter)
राम चरण (Ram Charan) आणि उपासनाचे (Upasana) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अभिनेता लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांच्या लेकीचा चेहरा दिसून येत नाही. लेकीला कुशीत घेतलेल्या राम चरणच्या चेहऱ्यावर आनंद आहे. उपासनादेखील खूप आनंदी दिसत आहे.
हटके पद्धतीने राम चरणने केलं मुलीचं स्वागत
राम चरणने शनिवारपासूनच लाडक्या लेकीचं स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे. लेकीसाठी त्यांनी हॅन्डमेड पाळणा खरेदी केला आहे. तसेच 'आरआरआर' या बहुचर्चित सिनेमाचे गायक काला भैरवने राम चरणच्या लेकीसाठी सुरेल अंगाई गायली आहे. राम चरण आणि उपासनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
राम चरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर गेल्यावर्षी राम चरणने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्याने लिहिलं होतं,"राम चरण आणि उपासना आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. तुम्हाला ही बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुमचं प्रेम असेच कायम राहुद्या".
राम चरणसाठी 'हे' वर्ष खास
राम चरणसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. राम चरणचा 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा सिनेमा चांगलाच गाजला. राम चरणचा 'द इंडिया हाऊस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच त्याचा 'गेम चेंजर' (Game Changer) हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Ram Charan - Upasana : मुलगी झाली हो! राम चरणच्या घरी छोट्या परीचं आगमन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)