एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIRAL VIDEO : कॉमेडियन दीपक कलालची भररस्त्यात धुलाई
रॅपर फझीलपुरियाचा मॅनेजर असल्याचं सांगणाऱ्या दीपक नंदालने राखी सावंतचा कथित बॉयफ्रेण्ड आणि कॉमेडियन दीपक कलाल याला मारहाण केल्याची माहिती आहे. विनोदाच्या नावाखाली जो बाष्फळपणा सुरु आहे, त्याबद्दल नेटिझन्सची माफी मागण्यास नंदालने दटावलं.
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंतचा कथित बॉयफ्रेण्ड आणि विनोदी कलाकार दीपक कलालचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये भररस्त्यात दीपकची धुलाई होत असल्याचं दिसत आहे. राजधानी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळेस कारशेजारी उभ्या असलेल्या दीपकला एका अनोळखी इसमाने मारहाण केली होती.
'इंडियाज गॉट टॅलेंट 8' मुळे दीपक कलाल प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर राखी सावंतसोबत लाईव्ह लग्न आणि हनिमून करण्याच्या चर्चांमुळे दीपकबाबत नेटिझन्समध्ये उत्सुकता होती.
रॅपर फझीलपुरियाचा मॅनेजर असल्याचं सांगणाऱ्या दीपक नंदालने मारहाण केल्याची माहिती आहे. विनोदाच्या नावाखाली जो बाष्फळपणा सुरु आहे, त्याबद्दल नेटिझन्सची माफी मागण्यास नंदालने दटावलं. त्यानंतर दीपक कलाल हात जोडून माफी मागतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
खुद्द दीपक कलालनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. काही मिनिटांतच वायरल झालेल्या या व्हिडिओचा नेटिझन्सनी समाचार घेतला आहे. काही जणांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement