Rakhi Sawant : राखी सावंतचा बायोपिक येणार! कोण साकारणार प्रमुख भूमिका? आलिया भट्ट की विद्या बालन?
Rakhi Sawant : 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीने माझा बायोपिक दिग्दर्शित करावा अशी इच्छा राखी सावंतने व्यक्त केली आहे.
Rakhi Sawant On Rishab Shetty : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता म्हैसूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्रीने आदिल दुर्राणीसोबतच्या (Adil Khan Durrani) वादावर भाष्य केलं आहे. या परिषदेत तिने दावा केला आहे की,आदिलने तिची फसवणूक केली आहे. तसेच अभिनेत्रीने 'कांतारा' (Kantara) फेम ऋषभ शेट्टीने (Rishab Shetty) माझा बायोपिक दिग्दर्शित करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
ऋषभ शेट्टीने माझा बायोपिक दिग्दर्शित करावा; राखी सावंतने व्यक्त केली इच्छा
पत्रकार परिषदेत राखी सावंतला अश्रू अनावर झाले होते. आदिलने तिचा छळ केल्याचं अभिनेत्री म्हणाली. त्यावेळी तिने 'कांतारा'सारख्या चांगल्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या ऋषभ शेट्टीने आपल्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळावी अशी इच्छा व्यक्त केली. राखीने आपल्या बायोपिकमध्ये 'ड्रामाक्वीन'च्या भूमिकेसाठी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि विद्या बालन (Vidya Balan) यांना विचारणा केली आहे.
राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेटकरी तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. आलिया भट्ट विचार करत असेल हे कसं शक्य आहे?, राखीचा बायोपिक सुपरफ्लॉप, आलिया भट्ट हा विनोदाचा विषय आहे का? डॉली बिंद्रा किंवा बेबिका ही सर्वोत्तम निवड असेल".
View this post on Instagram
राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आदिल काही दिवसांपासून तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. राखीला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' असेही म्हटले जाते.
राखी ही सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. 'मस्ती' आणि 'मैं हूं ना' या सिनेमांतदेखील राखीनं काम केलं आहे.
संबंधित बातम्या