Rakhi Sawant Adil Khan : राखी सावंतच्या आरोपांवर आदिलनं सोडलं मौन; म्हणाला, "मला सुशांत सिंह राजपूत व्हायचं नाही"
Adil On Rakhi : आदिल खानने अखेर राखी सावंतच्या आरोपांवर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने मला सुशांत सिंह राजपूत व्हायचं नाही, असं म्हटलं आहे.
Adil Khan Reaction On Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. तिने तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर (Adil Khan) फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच, मीडियालादेखील तिने आदिलला पाठिंबा देऊ नये आणि त्याची मुलाखत घेऊ नये, असे सांगितले होते. पण अखेर आदिल खानने आता या प्रकरणावर मौन सोडलं आहे. राखीने केलेल्या आरोपांवर अखेर त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आदिल खानने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून राखी सावंतने केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. त्याने लिहिलं आहे, "जर मी त्या महिलेबद्दल बोलत नसेल तर याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे. मी माझ्या धर्माचा आदर करणारा आहे आणि माझ्या धर्मात मला स्त्रियांचा आदर करायला शिकवलं आहे. त्यामुळे सध्या मी शांत आहे".
आदिलने पुढे लिहिलं आहे, "ज्या दिवशी मी तोंड उघडेल आणि ती माझ्यासोबत कशी वागली आहे, हे जगाला सांगेल त्यादिवशी ती काहीच बोलू शकणार नाही. माझ्यावर लोकांचा विश्वास बसू नये यासाठी ती दररोज मीडियासमोर येते आणि आदिल किती वाईट आहे, हे लोकांना सांगते. पण आता मला सुशांत सिंह राजपूत व्हायचं नाही."
मी राखीच्या पाठीशी उभा राहिलो आहे : आदिल खान
आदिल म्हणाला, "माझ्यासारखा समंजस मुलगा राखीच्या पाठीशी उभा राहिला आहे. तो खिशात एक रुपया घेऊन मुंबईत आला, हे लोकांना सांगण खूप सोप्प आहे. मला खरचं या प्लॅनचं खूप कौतुक वाटतं. जगासमोर सत्य येऊ नये, यासाठी राखीने मीडियाला माझ्यासोबत न बोलण्याचा सल्ला दिला. राखी एकदा मला म्हणाली होती, "मला हिरोसारखचं झिरो कसं बनवायचं, हे चांगलच माहीत आहे".
View this post on Instagram
आदिलच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांना खूप प्रश्न पडले आहेत. आदिल आणि राखीच्या नात्याचं नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आदिल खानमुळे राखीच्या वैयक्तिक आयुष्यात नवं वळण आलं आहे. राखीने सोशल मीडियावर आदिलसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नासंदर्भात माहिती दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :