Raju Srivastava health Update : प्रकृतीत किंचित सुधारणा, तापामुळे राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवरच
Raju Srivastava health Update : राजू श्रीवास्तव (Raju Srivastava ) यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने 10 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत.
Raju Srivastava Health : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होतच होती की, गुरुवारी त्यांना सडकून ताप भरला. तापानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांना संसर्गामुळे वारंवार ताप येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरूनही काढण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांच्या हात-पायांमध्ये हालचाल दिसून आली होती. त्यांना शुद्ध देखील आली होती. ते उपचारांनाही प्रतिसाद देत होते, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वारंवार येतोय ताप
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे जवळपास गेले 24 दिवस दिल्लीच्या एम्समध्ये दाखल आहेत. दरम्यान, त्यांना केवळ एकदाच शुद्ध आली होती. परंतु, आता संसर्गामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. त्यांना वारंवार ताप येत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. 100 डिग्री ताप आल्याने राजू यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव स्वतः 80-90 टक्क्यांपर्यंत नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत.
जिममध्ये आला होता हृदयविकाराचा झटका
जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते.
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava ) 10 ऑगस्टपासून सतत लाईफ सपोर्ट सिस्टीमवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करून त्यांचा स्टेंट काढला. एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर नितीश नायक यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
संबंधित बातम्या