एक्स्प्लोर

Raju Srivastava Health Update : 'निर्लज्ज लोक...'; राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर भडकले दीपू श्रीवास्तव

नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन दीपू यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

Raju Srivastava health Update : कॉमेडियन  राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी (10 ऑगस्ट) सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर पडले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती  बिघडत असल्यानं त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. पण काही लोक राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरवत आहेत. या अफवा  पसरवणाऱ्यांवर आता राजू यांचे भाऊ म्हणजेच दीपू श्रीवास्तव हे भडकले आहेत. नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन दीपू यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. 
 
काय म्हणाले दीपू श्रीवास्तव 
दीपू यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसवणाऱ्यांबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, 'काही निर्लज्ज लोक आमच्यासोबत न बोलता आणि कोणतीही माहिती न घेता सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत. देशातील बेस्ट डॉक्टर्स सध्या राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत आहेत. लवकरच ते पुन्हा लोकांचे मनोरंजन करायला सज्ज होतील.'

पाहा व्हिडीओ: 
 
मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात. 

काय म्हणाल्या शिखा श्रीवास्तव? 
'राजूजींची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांचे काम चोखपणे करत आहेत. राजूजी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण व्यवस्थापन दिवसरात्र काम करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. राजूजी हे लढवय्ये आहेत, ते ही लढाई नक्कीच जिंकतील. ते लढतील आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी बरे होऊन परत येतील, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. आम्हाला शुभेच्छा, आशीर्वाद मिळत आहेत आणि बरेच लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मी सर्वांना प्रार्थना करत राहण्याचे आवाहन करू इच्छिते', असं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये राजू यांच्या पत्नी शिखा यांनी सांगितलं होतं. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Raju Srivastava Health Update : 'ते लढवय्ये आहेत, ही लढाई ते नक्कीच जिंकतील'; राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीनं दिली माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Embed widget