रजनीकांतच्या 'अन्नात्थे' चं शूटिंग पुन्हा सुरु, नयनताराही पोहचली हैदराबादेत
रजनीकांतच्या 'अन्नात्थे' या चित्रपटाच्या शूटिंगला फेब्रुवारीत सुरुवात झाली होती. नंतर कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शूटिंग थांबवण्यात आलं होतं.

हैदराबाद: सुपरस्टार रजनीकांतने आपला चित्रपट 'अन्नात्थे' चं पुन्हा शूटिंग सुरु केलंय. त्यासाठी तो आता हैदराबादमध्ये पोहचला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री नयनतारा देखील त्या ठिकाणी पोहचली आहे. या चित्रपटात किर्ती सुरेश, खुशबू, जॅकी श्रॉफ, मीना आणि प्रकाश राज हे देखील प्रमुख भूमिकेत असतील.
सुपरस्टार रजनीकांतच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर 'अन्नात्थे' चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरु झालंय. या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेत्री नयनतारा देखील आहे. ती रजनीकांतच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. सन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मीती करणार आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगला फेब्रुवारीत सुरुवात झाली होती. नंतर कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शूटिंग थांबवण्यात आलं होतं. सन पिक्चर्सने ट्विटर हॅन्डलवर काही फोटो शेअर केलेत. यामध्ये रजनीकांत पांढरा कुर्ता आणि पायजम्यात दिसतो. दुसऱ्या एका फोटोत तो आपल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसतोय. हे फोटो शेअर करताना त्याखाली 'सुपरस्टार रजनीकांत आपल्या अन्नात्थे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबाद साठी रवाना होत आहे' असं लिहण्यात आलंय.
#SuperstarRajinikanth leaves to Hyderabad for #Annaatthe shoot pic.twitter.com/1YVdhVcIMY
— Sun Pictures (@sunpictures) December 13, 2020
दोन दिवसापूर्वीच रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आर. धनुष हिने रजनीकांत सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रजनीकांत आणि ऐश्वर्या खुर्चीत बसून गप्पा मारत आहेत. या दोघांनीही मास्क घातल्याचंही दिसतं.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
