एक्स्प्लोर

Rajinikanth Birthday : थलैवाचा वाढदिवस, लवकरच राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार रजनीकांत

Rajinikanth Birthday : अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज वाढदिवस आहे. 70 व्या वर्षी तुफान एनर्जी असलेला हा अवलिया कलाकार लवकरच राजकारणाच्या पडद्यावर नव्या भूमिकेत दिसून येणार आहे.

Rajinikanth Birthday : अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज वाढदिवस आहे. 70 व्या वर्षी तुफान एनर्जी असलेला हा अवलिया कलाकार लवकरच राजकारणाच्या पडद्यावर नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. रजनीकांत यांनी नुकतीच तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. तर जानेवारीत नवीन पक्षाचं लॉन्चिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे. तमिळनाडू (Tamil Nadu) मधील गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

निवडणूक लढण्याचे दिले संकेत

तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा (Tamil Nadu Assembly Election) निवडणूकीपूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांचं राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले होते की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.

गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहेत रजनीकांत

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती.

Superstar Rajinikanth's Political Entry: ठरलं! रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, 31 डिसेंबरला मोठी घोषणा

रजनीकांत यांच्या राजकीय एन्ट्रीबाबत चर्चा रंगल्यानंतर ट्विटरवर #RajinikanthPoliticalEntry हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.. यापूर्वी रजनीकांत यांनी 2017 साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना करणार. पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी
प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी
OTT Mystery Thriller Series IMDb 8 Rating: वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget