एक्स्प्लोर

Raj kundra: पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राच्या आयुष्यावर बायोपिक; स्वतःच साकारणार भूमिका

राज कुंद्राच्या (Raj Kundra) आयुष्यावर आधारित असणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Raj kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.  2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर 21 सप्टेंबर 2021 रोजी राज कुंद्रची सुटका झाली. आता राज कुंद्राच्या आयुष्यावर आधारित असणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या बायोपिकमध्ये राज हा स्वत:च काम करणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

एका वेबसाइटच्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, 'राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्यानं तुरुंगात घालवलेला वेळ एका चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर दाखण्यात येणार आहे. आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याबद्दल चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव  गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.  राज कुंद्रा या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये क्रिएटिव्ह कामासाठी जोडला जाणार आहे.

पुढे सोर्सनं सांगितलं, 'राज कुंद्राचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या रिपोर्टपासून ते मीडिया रिपोर्टिंग तसेच त्यानं तुरुंगात घालवलेला वेळ आणि घरी परत येण्यापर्यंत सर्व काही या चित्रपटात दाखवण्यात येईल. चित्रपटाची कथा कुंद्रा आणि त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीकोनातून असणार आहे. या चित्रपटाबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.'

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला.  त्यानंतर राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर पुन्हा कमबॅक केला. आता राज कुंद्राच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये राजसोबतचे इतक कोणते कलाकार काम करणार? याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी 2009 मध्ये लग्न केले होते. त्यांच्या नात्याची आणि लग्नाची खूप चर्चा झाली.  

View this post on Instagram
 
A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Raj Kundra : राज कुंद्राच्या ट्वीटनं वेधलं लक्ष; म्हणाला, 'आर्थर रोड जेलमधून बाहेर येऊन आज एक वर्ष...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 03 March 2025Devendra Fadnavis : कोकाटेंच्या शिक्षेवरुन दावनेंचा सवाल, गदारोळ होताच फडणवीस उठले अन्...Vidhan Parishad Rada : विधान परिषद सुरु होताच पहिल्याच मिनिटात राडा, पाहा UNCUT VIDEOKaruna Sharma: Dhananjay Munde यांच्या प्रेशरमुळे अजितदादा राजीनामा जाहीर करत नाही : करुणा शर्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
Embed widget