(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सोडले मौन; म्हणले, 'मला...'
परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.
Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. बुधवारी (22 मार्च) हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यांच्या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे. का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता अफेरच्या चर्चेवर राघव चढ्ढा यांनी मौन सोडलं आहे.
काय म्हणाले राघव चढ्ढा?
डेटिंगच्या चर्चेबाबत विचारण्यात आल्यानंतर आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.' पुढे राघव यांना प्रश्न विचारण्यात आला की, जे लोक तुमच्या रिलेशनशिपबाबत विचारत आहेत, त्यांना काय सांगाल?' यावर ते म्हणाले, 'त्यांनाही लवकरच उत्तर मिळेल.' राघव यांच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
AAP के राज्यसभा सांसद @raghav_chadha का हाल ही में परिणीति चोपड़ा संग वीडियो वायरल हुआ था. इस पर जब एबीपी न्यूज़ ने राघव से सवाल पूछा तो देखिए उन्होंने क्या जवाब दिया.... @jainendrakumar #RaghavChadha #ParineetiChopra #AamAadmiParty #Bollywood pic.twitter.com/11xIAQfZyM
— ABP News (@ABPNews) March 24, 2023
काही दिवसांपूर्वी लंच करण्यासाठी राघव चढ्ढा आणि परिणीती मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले यावेळी काही फोटोग्राफर्सनं राघव आणि परिणीती यांचे फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते. परिणीती ही सध्या सिंगल आहे. तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं जात. पण परिणीतीनं आपल्या रिलेशनशिपबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही. तर 34 वर्षीय राघव चढ्ढा हे अद्याप अविवाहित आहेत. राघव चढ्ढा हे सोशल मीडियावर देखील परिणीतीला फॉलो करतात.
परिणीतीचे चित्रपट
इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :