Qala: 'काला' मध्ये अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश; पोस्ट शेअर करत म्हणाले...
काला (Qala) या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दिसत आहे.
Qala: दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बाबिलनं काला (Qala) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. या चित्रपटात बाबिलसोबतच अभिनेत्री तृप्ती डिमरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दिसत आहे. कालामध्ये अनुष्कानं एक छोटी भूमिका साकारली आहे. काला या चित्रपटात अनुष्काला पाहून नेटकरी खुश झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
जवळपास चार वर्षांनी अनुष्काला चित्रपटामध्ये पाहुन अनेक नेटकरी खुश झाले. सोशल मीडियावर सध्या कालामधील 'घोडे पे सवार' या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अनुष्काच्या रेट्रो लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
नेटकऱ्यांच्या पोस्ट
एका नेटकऱ्यानं काला चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अनुष्काला चार वर्षानंतर स्क्रिनवर पाहताना खूप आनंद होत आहे.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'अनुष्का शर्मा ही अष्टपैलुत्व अभिनेत्री आहे. अनुष्काचा स्क्रीन प्रेझेन्स खूप छान आहे. तिच्या पुनरागमनाची आम्ही वाट बघत होतो. '
OMGGGGGGGGGG!!!! 😭😭😭😭😭
— Anshu (@TweetingAnshu) December 1, 2022
It feels amazing to see #AnushkaSharma back on screen after 4 years.
Watch #Qala on Netflix RIGHT NOW!!!#QalaonNetflix #TriptiDimri pic.twitter.com/PoBYHC7lW8
Anushka ne khud nahi bataya tha 😭😂
— Shreya TejRan ♥ Virushka ♥ (@ShreyaTejran) December 2, 2022
But yeah she is looking so preetty ❤❤@AnushkaSharma ❤#AnushkaSharma https://t.co/iWrE2NSSLw
Anushka Sharma is the combination of beauty and versatility.
— Juhiiii... (@Juhiiithebeauty) December 3, 2022
This woman's screen presence is so good.
Waiting for her comeback,
Gem of Indian cinema. https://t.co/2YGYcFVvnb
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: