Pushpa Trailer Out : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाच्या 'Pushpa: The Rise' सिनेमाचा ट्रेलर आऊट, थरार नाट्य असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpa: The Rise : 'पुष्पा: द राइज' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Pushpa: The Rise : तेलगू स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) च्या 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जंगलातील मूळ रहिवासींचा गुंतागुंतीचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. ट्रेलर अॅक्शन, हिंसा, दमदार संवाद आणि रोमान्सने भरलेला आहे.
'पुष्पा: द राइज' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शनची झलक पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सिनेमातील मुख्य पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. अल्लू अर्जुन या सिनेमात चंदन तस्करची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये चंदन तस्कर या पात्राची ओळख करून देताना अॅक्शन सीक्वेन्स आणि डान्सचा वापर करण्यात आला आहे. तर इतर पात्रांची ओळख छोट्या छोट्या झलकांमध्ये केली आहे.
Here it is! #PushpaTrailer out now.
— Allu Arjun (@alluarjun) December 6, 2021
Telugu : https://t.co/bGt9hVVzP8
Tamil : https://t.co/Z668h8gH2G
Kannada : https://t.co/kAMdZolPHf
Malayalam : https://t.co/5ZiGRnSEkC #PushpaTheRise #PushpaTheRiseOnDec17th pic.twitter.com/Kw5qRvNn10
रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, अनुसया भारद्वाज, अजय गोश आणि इतर कलाकारांच्या या सिनेमात महत्तवाच्या भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तर निर्मिती रविशंकर यांनी केली आहे. थरार नाट्य असलेला हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. मल्याळम, तमिळ, हिंदी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'रश्मिका'च्या पात्रावर आधारित गाणे
'श्रीवल्ली' गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात रश्मिका कोणती भूमिका साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील हे दुसरे गाणे 'रश्मिका'च्या पात्रावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे. चित्रपटातील या गाण्याचे अनेक प्रेमळ पदर आहेत. तसेच या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे पाच भाषांत बनवलेले आहे. 2021 सालातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय होणार आहे.
संबंधित बातम्या























