Jaat Teaser Launch: 'पुष्पा 2' सोबतच सिनेमागृहांत प्रेक्षकांना आणखी एक पर्वणी, रिलीज होणार सनी देओलच्या जाट सिनेमाचा टीझर
Jaat Teaser Launch: गदर 2 नंतर सनी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाट सिनेमाच्या टीझरविषयी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
Jaat Teaser Launch: सनी देओलच्या (Sunny Deol) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 'गदर 2'पासून (Gadar 2) सनी देओलला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यादरम्यान नुकतीच सनी देओलने चाहत्यांसाठी एक खास घोषणा करण्यात आलीये. सनीच्या आगामी 'जाट' (Jaat Movie) सिनेमाच्या टीझरविषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे. 'गदर 2' रिलीज होऊन दीड वर्षानंतर आता सनी देओलचा जाट सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होत. त्यातच आता हा टीझर येत्या 5 डिसेंबर रोजी जगभरात रिलीज करण्यात येणार आहे. सनी देओलच्या चित्रपटाचा टीझर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटासह पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सनी देओलने त्याच्या सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. त्याने म्हटलं की, जाट सिनेमाचा सर्वात ग्रँड टीझर लॉन्च. जगभरातील 12,500 हून अधिक स्क्रीन्सवर पुष्पा 2 द रुलसोबत या टीझरचे साक्षीदार व्हा.. त्यामुळे पुष्पा 2 सोबतच आता सिनेमागृहांत प्रेक्षकांना जाट सिनेमाचीही झलक पाहता येणार आहे.
सनी देओलचा वर्क फ्रंट
सनी देओलचा ॲक्शनपट चित्रपट 'जाट' कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 'जाट' व्यतिरिक्त सनी देओलकडे प्रीती झिंटासोबत लाहोर 1947 आणि वरुण धवनसोबत बॉर्डर 2 सारखे चित्रपटही आहेत.
'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला जगभरात प्रदर्शित होणार
'पुष्पा 2: द रुल' अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'पुष्पा : द राइज'चा सिक्वेल आहे ज्याची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील या चित्रपटाचा भाग आहेत.
View this post on Instagram