Pushpa 2 Box Office Collection Day 4: 'बाहुबली'लाही टाकलं मागे, बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'नेच गाजवलं!
Pushpa 2 Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2ची यशस्वी घोडदौड पाहायला मिळतेय.
Pushpa 2 Box Office Collection Day 4: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे. ओपनिंग डे कलेक्शनमध्ये रेकॉर्डब्रेक आकडे देणाऱ्या या चित्रपटाने आज पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिसच्या आकड्यांशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहेत.
पुष्पा 2 सिनेमाने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपयांची कमाई केली आणि सर्वात मोठी ओपनिंग असलेला भारतीय चित्रपट ठरला. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी कमी झाली आणि चित्रपटाने सर्व भाषांमध्ये 93.8 कोटींची कमाई केली.तिसऱ्या दिवशी वीकेंड जवळ येताच चित्रपटाने कमाईत वाढ दाखवली आणि पुन्हा 100 कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी रात्री 10:40 वाजेपर्यंत 141.5 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह चित्रपटाने आतापर्यंत एकूण 529.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पुष्पा 2 ने 'हे' मोठे रेकॉर्ड तोडले
पुष्पा 2 ने केवळ बॉलीवूड, हॉलीवूड आणि दक्षिणेतील सर्व ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. जेलरस लियो, पीके या सिनेमांशिवाय एवेंजर्स एंड गेम (373.05 कोटी) सिनेमांचाही रेकॉर्ड मोडल आहे. त्याचप्रमाणे दंगल सिनेमाचाही रेकॉर्ड या सिनेमाने मोडलाय.
पुष्पा 2चे बजेट
पुष्पा 2 जवळपास 500 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला असून या चित्रपटाने हे बजेट ओलांडले आहे. लवकरच हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.पुष्पा 2 चे दिग्दर्शन दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. त्याने या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली बनवला जो ब्लॉकबस्टर ठरला. त्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram