Pushpa 2 : 'पुष्पा 2'चं शूटिंग अचानक थांबलं; शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनला दुखापत
Pushpa 2 : 'पुष्पा 2' या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनला (Allu Arjun) दुखापत झाली आहे.
Pushpa 2 Shooting Allu Arjun Got Injured : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा सिनेमा चांगलाच गाजला असून सिनेप्रेमी आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 'पुष्पा 2' संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण आता 'पुष्पा 2'च्या शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनला दुखापत झाली आहे. त्यामुळे शूटिंगही थांबवण्यात आलं आहे.
'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे.
अल्लू अर्जुनला दुखापत
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनला दुखापत झाली आहे. अॅक्शन सीन शूट करण्यादरम्यान अल्लू अर्जुनला दुखापत झाली आहे. अल्लू अर्जुनच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. आता अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अद्याप यासंदर्भात काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'पुष्पा 2'च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार?
'पुष्पा 2' या सिनेमाचं शूटिंग थांबलं असल्याने चाहते नाराज झाले आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'पुष्पा 2' या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' ओटीटीवर होणार रिलीज!
सिनेमागृह गाजवल्यानंतर 'पुष्पा' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. प्राइम व्हिडीओने 30 कोटी रुपयांत या सिनेमाचे राईट्स विकत घेतले होते. पण आता 'पुष्पा 2' या सिनेमाचे राईट्स नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले होते. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने दिलेल्या रकमेपेक्षा तीस टक्के जास्त नेटफ्लिक्सने दिले असल्याचं समोर आलं आहे. 'पुष्पा 2' या सिनेमाचे ओटीटी राईट्स 90 कोटी रुपयांत विकले गेले आहेत.
संबंधित बातम्या