Priyanka Chopra : "मी फक्त सत्य सांगितलं"; बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्राने अखेर मौन सोडलं
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलं आहे.

Priyanka Chopra On Discrimination In Bollywood : हिंदी सिनेसृष्टीसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या 'सिटाडेल' (Citadel) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी 'देसी गर्ल'ने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलं होतं. आता 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी प्रियंका भारतात आली असून बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर तिने अखेर मौन सोडलं आहे.
प्रियंकाने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं. आता 'सिटाडेल'च्या प्रमोशनदरम्यानचा प्रियंकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रियंका काय म्हणाली? (Priyanka Chopra Viral Video)
प्रियंका म्हणतेय,"बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला तेव्हा मी 20 वर्षांची होते आणि त्यावेळी या विषयावर जाहिररित्या बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती. आज मी स्वत:ला सिद्ध केलं असून आज या विषयावर मी बोलू शकते. बॉलिवूडमधील राजकारणाबद्दल मी फक्त सत्य सांगितलं आहे".
View this post on Instagram
बॉलिवूडमधील राजकारणावर प्रियंका काय म्हणाली होती?
बॉलिवूडमधील राजकारणावर प्रियंका म्हणाली होती,"बॉलिवूडमध्ये चांगलं काम केल्यानंतरही मला वाळीत टाकलं जात होतं. काम मिळत नव्हतं. त्यामुळे बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला होता आणि याच कारणाने मी काही दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मी अनेक हॉलिवूड सिनेमे पाहिले आणि पुन्हा कमबॅक करताना हॉलिवूड सिनेमा करण्याचा निर्णय घेतला".
प्रियंकाचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Movies)
प्रियंकाची 'सिटाडेल' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत या वेबसीरिजची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या 28 एप्रिलपासून ही सीरिज प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. 'देसी गर्ल'चा 'लव्ह अगेन' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमातदेखील अभिनेत्री झळकणार आहे.
संबंधित बातम्या























