Manjiri Prasad Oak : 9 महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं अन् पुढे; प्रसाद ओकच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव
Manjiri Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओकने एका मुलाखतीत आयुष्यात आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
![Manjiri Prasad Oak : 9 महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं अन् पुढे; प्रसाद ओकच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव Prasad Oak Wife Manjiri Oak Talked About Incident when she throw out from train while she was 9 Month Pregnant Know Details Entertainment Latest Update Marathi News Manjiri Prasad Oak : 9 महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं अन् पुढे; प्रसाद ओकच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/88b67bf27e0d07a157de6024a0b19b5c1706863945136254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Manjiri Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. आता एका मुलाखतीत मंजिरीने आयुष्यात आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 9 महिन्यांची गरोदर असताना तिला ट्रेनमधून ढकलण्यात आलं होतं.
प्रसाद ओक आणि मंजिरीने मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनेक समस्यांचा सामना करत त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. प्रसाद हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. तर मंजिरीनेदेखील काही वर्षांपूर्वीच निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दोघांनीही शून्यातून आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. प्रसादच्या यशात मंजिरीचा मोलाचा वाटा आहे.
प्रसादच्या पाठिशी मंजिरी कायमच खंबीरपणे उभी राहिली आहे. मंजिरी ओक सध्या मनोरंजनसृष्टीत सक्रीय असली तरी गेल्या 23 वर्षांपासून गृहिणी म्हणून ती काम करत होती. गृहिणीआधी दोन वर्षे ती नोकरी करत होती. पण पुढे तिने संसार आणि मुलांकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला.
9 महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं..
प्रसादची पत्नी मंजिरी दोन वर्षे मार्केटिंग या क्षेत्रात काम करत होती. नोकरीदरम्यान तिला एक धक्कादायक अनुभव आवा. त्यानंतर तिने नोकरी सोडून घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. असोआवा दिलेल्या मुलाखतीत मंजिरी म्हणाली,"मी 9 महिन्यांची गरोदर असताना मला लोकलमधून ढकलून देण्यात आलं होतं".
मंजिरी म्हणाली,"गृहिणी होणं हा मोठा टास्क आहे. 23 वर्षे मी पूर्णपणे गृहिणी म्हणून राहिली आहे. 23 वर्षांआधी मी मुंबईत नोकरी करत होते. त्यावेळी माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता. 9 महिन्यांची गरोदर असताना नोकरीसाठी मी ट्रेनने प्रवास करत होते. माझी डिलिव्हरी कधीही होऊ शकते, अशी ती वेळ होती. त्यामुळे कोणीतरी मागून मला ट्रेनमधून ढकललं आणि मी प्लॅटफॉर्मवर पडले. तेव्हा मी खूप घारबले होते".
मंजिरी पुढे म्हणाली,"मी तेव्हा मार्केटिंगचा जॉब करायची आणि तेव्हा मला खूप फिरायला लागायचं. मला तसा ट्रेनचा प्रॉब्लेम नव्हता. पण हे अचानक घडलं त्यामुळे मला त्याची भीती वाटली. संध्याकाळी हे जेव्हा प्रसादला सांगितलं तेव्हा तो म्हणाला तू आता घरी राहा. तोपर्यंत दूरदर्शन सुरू झालं होतं. इतर चॅनेल नव्हते. पण दूरदर्शनवर बंदिनी, दामिनी यया मालिका होत्या. त्यामुळे पैसे बरे येत होते. आमचं भागेल एवढं होतं. म्हणून मग मी ती नोकरी सोडली".
संबंधित बातम्या
Prasad Oak Manjiri Oak : 'अशी' सुरू झाली प्रसाद-मंजूच्या 'प्रेमाची गोष्ट'; लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी मंजिरीची खास पोस्ट, प्रसादच्या रोमॅंटिक कमेंटने वेधलं चाहत्यांचं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)