Prabhas-Kriti Sanon : ‘बाहुबली’ प्रभास क्रिती सेननच्या प्रेमात? सोशल मीडियावर केलं अभिनेत्रीचं कौतुक
Prabhas-Kriti Sanon : प्रभास आणि क्रिती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. तर, या चित्रपटादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलल्याचे म्हटले जात आहे.
Prabhas-Kriti Sanon : एकीकडे बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) या इंडस्ट्रीत 10 वर्षे पूर्ण केली. तर, दुसरीकडे याच दिवसाचं खास निमित्त साधत वरुणच्या बहुप्रतिक्षित 'भेडिया' (Bhediya) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटात वरुण रोमँटिक स्टाईलमध्ये दिसणार नसून, एका भितीदायक रूपात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो एका इच्छाधारी लांडग्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील दिसणार आहे. केवळ वरुणचं नाही तर, या चित्रपटातील क्रितीच्या लूकचेही खूप कौतुक होत आहे. आता ‘बाहुबली’ स्टार प्रभासने (Prabhas) देखील सोशल मीडियावर देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
प्रभास आणि क्रिती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. तर, या चित्रपटादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलल्याचे म्हटले जात आहे. यातच आता प्रभासने ‘भेडिया’च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. तर, क्रितीनेही त्यावर छानसा रिप्लाय दिला आहे.
प्रभासने सोशल मीडियावर केले कौतुक
वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर 'भेडिया' या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना आवडला आहे. तर, कलाकार मंडळीही या ट्रेलरचे कौतुक करत आहेत. साऊथ सुपरस्टार प्रभासने देखील त्याच्या इन्स्टा स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कौतुक करताना लिहिले की, 'ट्रेलर खूपच छान झाला आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.’ यात त्याने क्रिती आणि वरुण धवन यांना टॅग केले आहे.
क्रितीनेही दिला क्युट रिप्लाय
प्रभासने चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे, त्यावर आता क्रिती सेननही अभिनेत्याला रिप्लाय दिला आहे. यावर कमेंट करताना क्रितीने लिहिले की, 'प्रभास तू खूप क्यूट आहेस... धन्यवाद.' यासोबतच क्रितीने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. क्रिती सेननच्या या उत्तराने सोशल मीडिया युझर्सच्या आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. क्रितीच्या या उत्तराने चाहते देखील खूश झाले आहेत.
वरुण-क्रिती करतायत एकमेकांना डेट
क्रिती (Kriti Sanon) आणि प्रभासच्या जोडीची.. सध्या क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव एकत्र जोडले जात आहेत. सोशल मीडियावरही त्यांची जोडी सध्या खूप ट्रेंड करत आहे. प्रभास आणि क्रिती सेनन एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघेही लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’चे (Adipurush) शूट संपल्यानंतरही दोघांमधील नाते अजूनही घट्ट आहेत. दोघेही एकमेकांना सतत कॉल किंवा मेसेज करत असतात. दोघेही एकमेकांना पूर्ण वेळ, आदर आणि प्रेम देताना दिसतात. जेव्हा दोन सेलिब्रिटी चित्रपटात एकत्र काम करतात, तेव्हा त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या नेहमीच समोर येतात. पण क्रिती आणि प्रभास याबाबतीत वेगळे आहेत. दोघेही एकमेकांबद्द्ल खूप सिरिअस आहेत.
हेही वाचा: