एक्स्प्लोर
पाळणा कधी हलणार, राज कुंद्राचा बिपाशाला सवाल

मुंबई : नवविवाहित दाम्पत्यांना 'पाळणा कधी हलणार?' असं विचारुन बऱ्याचदा चिडवलं जातं. बॉलिवूडचं नवदाम्पत्य बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनाही असेच काही प्रश्न विचारले जात आहेत. ट्विटरवर हा खोडसाळपणा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आहे. बिपाशाच्या लग्नाला जेमतेम महिना होत आहे. त्यांच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो ताजे असतानाच राज कुंद्रा बिप्सला 'तो' प्रश्न विचारुन छेडलं आहे. शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसानिमित्त बिपाशाने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. त्यावर राजने 'विआन त्याला मित्र कधी मिळणार?' असं विचारत असल्याचं आडून म्हटलं. राजचा निशाणा अर्थातच बिपाशाच्या प्रेग्नन्सीकडे होता. https://twitter.com/bipsluvurself/status/734031194703073280 सात जन्म सोबतीच्या आणाभाकांनंतर बिपाशा-करणचा इन्टिमेट किस राजच्या प्रश्नावर बिपाशानेही दिलखुलासपणे उत्तर दिलं. 'इतक्यात तरी नाही. सध्या आम्हीच त्याचे मित्र आहोत', असं ट्वीट बिपाशाने केलं. https://twitter.com/TheRajKundra/status/734212575500472321 https://twitter.com/bipsluvurself/status/734623984327786496 अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर 30 एप्रिल 2016 रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर दोघांच्या हनिमूनच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होती.
संबंधित बातम्या :
करणसिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नावर केआरकेचा टोमणा
हनिमूनला सलमानला सोबत नेणार : बिपाशा बसू
आणखी वाचा























