एक्स्प्लोर
पूजा बेदीची मुलगी आलिया बॉलिवूडमध्ये, सैफसोबत सिनेमा
नितीन कक्कर दिग्दर्शित 'जवानी जानेमन' या चित्रपटातून अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमाची निर्मितीही सैफ अली खाननेच केली आहे.
मुंबई : आणखी एक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्री पूजा बेदीची कन्या आलिया फर्निचरवाला सिनेविश्वात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे अभिनेता सैफ अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
नितीन कक्कर दिग्दर्शित 'जवानी जानेमन' या चित्रपटातून आलिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमाची निर्मितीही सैफनेच केली आहे. 21 वर्षांची आलिया या सिनेमात सैफच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
'जवानी जानेमन' हा विनोदी चित्रपट बापलेकीच्या नात्याची गोष्ट सांगणार आहे. 40 वर्षीय पिता आणि त्याची किशोरवयीन मुलगी या चित्रपटाची मध्यवर्ती पात्रं आहेत. 2019 मध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
मॉडेल-अभिनेत्री पूजा बेदी ही ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी आणि नृत्यांगना प्रॉतिमा बेदी यांची कन्या. पूजा बेदीने जो जिता वही सिकंदर या सिनेमात भूमिका केली होती. बिग बॉस, फिअर फॅक्टर, नच बलिए, झलक दिखला जा यासारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. काही टीव्ही शोजचं सूत्रसंचालन करण्यासोबत तिने आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनही केलं आहे.
पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला 1994 मध्ये विवाहबंधनात अडकले. 1997 मध्ये त्यांची मुलगी आलियाचा जन्म झाला, मात्र 2003 साली पूजा आणि फरहान विभक्त झाले.
पाहा आलिया फर्निचरवालाचे आणखी फोटो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement