Allu Arjun : 'पुष्पा:2' च्या रिलीज आधीच अल्लू अर्जुन अडचणीत, अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल
Pushpa 2: अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, या अभिनेत्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Pushpa 2 Actor Allu Arjun: यंदाच्या वर्षातला बहुप्रतिक्षीत पुष्पा : 2 (Pusha 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या सिनेमाचा मुख्य नायक अल्लू अर्जुनविषयी (Allu Arjun) एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. कारण अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच, मुंबईत एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान अल्लूने त्याच्या चाहत्यांना 'आर्मी' असे संबोधित केले. या संदर्भात श्रीनिवास गौर नावाच्या व्यक्तीने अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. गौर यांनी हैदराबादमधील जवाहर नगर पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. चाहत्यांसाठी 'आर्मी' हा शब्द वापरल्याने अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.
'त्या' व्यक्तीने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
संबंधित व्यक्तीने व्हिडीओ शे्र करत म्हटलं की, "आम्ही टॉलीवूड स्टार अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी आर्मी हा शब्द वापरु नये अशी विनंतीही केली आहे. 'आर्मी' हा एक आदरणीय पोस्ट असल्याचं ग्रीन पीस एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर हार्वेस्टिंग फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास यांचं म्हणणं आहे. ते आमच्या देशाचे रक्षण करतात, म्हणून तुम्ही तुमच्या चाहत्यांना असे म्हणू शकत नाही, त्याऐवजी ते इतर शब्द वापरू शकतात.
अल्लू-रश्मिका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त
अल्लू अर्जुनचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ज्यामध्ये 'श्रीवल्ली'च्या मुख्य भूमिकेत रश्मिका मंदान्ना, मल्याळम सुपरस्टार फहाद फासिल आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
भारतात 200 कोटींहून अधिक रुपयांनी ओपनिंग करणार?
अहवालात दावा करण्यात आला आहे की, 'पुष्पा 2: द रुल' भारतात पहिल्या दिवशी 233 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह ओपनिंग करणार असल्याचं म्हटलं जातंय. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपट पहिल्या दिवशी 105 कोटींची कमाई करू शकतो. हा चित्रपट कर्नाटकात 20 कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये 15 कोटी रुपये आणि केरळमध्ये 8 कोटी रुपये कमवू शकतो. इतर राज्यांमधून, 'पुष्पा 2: द रुल' सुमारे 85 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो.