एक्स्प्लोर

अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 2' विरोधात हायकोर्टात याचिका

औरंगाबाद : हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी-2' या सिनेमाविरोधात याचिका दाखल झाली आहे. सिनेमात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा करण्यात आल्याचं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. जे. दीक्षित, आर. एम. धोर्डे आणि डॉ. कानडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीने सिनेमा पाहून 3 फेब्रुवारी रोजी अहवाल द्यावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. अॅड. अजयकुमार वाघमारे, अॅड. पंडितराव आनेराव यांनी 'जॉली एलएलबी 2' विरोधात याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमूर्तींच्या डायसवर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर हाणामारी आणि बीभत्स नृत्यही करतात, असं दाखवण्यात आलं आहे. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असं लिहून निर्माता आणि दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकिली व्यवसायाची थट्टा केली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव, केंद्रीय विधी आणि न्याय सचिव, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, फॉक्‍स स्टार इंडिया स्टुडिओ, चित्रपटाचे निर्माता, लेखक सुभाष कपूर, अक्षयकुमार, अन्नू कपूर, राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सचिव, विधी आणि न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य आणि एलएलबी हा शब्द वगळावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. हा सिनेमा 10 फेब्रुवारी रोजी भारतासह दहा देशात रिलीज होणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलरची सीडी आणि छायाचित्र खंडपीठात दाखल करण्यात आले. खंडपीठाने ही याचिका लोकहितवादी याचिका म्हणून दुरुस्ती करण्यास परवानगी दिली आहे. ट्रेलर : संबंधित बातम्या :

अक्षयकुमारच्या 'जॉली एलएलबी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

भ्रष्टांपुढे जॉली झुकणार नाही, 'जॉली एलएलबी 2'चा दुसरा ट्रेलर

‘जॉली एलएलबी-2’ चा मेकिंग व्हिडिओ रिलीज

'बावरा मन..' अक्षयच्या 'जॉली एलएलबी 2' मधलं रोमँटिक गाणं

'जॉली एलएलबी 2' चा फर्स्ट लूक रिलीज

'जॉली एलएलबी 2' साठी अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी रुपये!

अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’चं पोस्टर रिलीज, शूटिंगही सुरु

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
Ajay Devgans Dhamaal 4 Box Office: दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
Kangana Ranaut on CJP: आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
Abhinav Shuklas Podcast: 'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget