एक्स्प्लोर

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: केंद्र सरकारकडे नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करा, अशी मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं केलीय.

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि त्यावरुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janta Party) आंदोलन सुरू केलंय. आता हे आंदोलन देशातल्या गावाखेड्यांत पोहोचलं असून सर्वत्र याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच, बहुतेकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तर, काहींनी आंदोलकांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यात. अशातच सध्या आपल्या सडेतोड कामाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (Tamil Nadu Chief Minister Thalapathy Vijay) यांनीही विद्यार्थी आंदोलन आणि नीट परीक्षेतील घोटाळा यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि 'तमिळगा वेत्री कळगम' (TVK) चे अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरुन सुरू असलेल्या देशव्यापी निदर्शनांबाबत आपली भूमिका मांडली. त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध केला. थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाईचं वर्णन 'अलोकतांत्रिक' असं केलंय. 'संसद मार्च'मध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील पोलीस कारवाईनंतर, संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांच्या पाठीशी आपला पक्ष (TVK) ठामपणे उभा असल्याचं विजय यांनी ट्वीट करुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच, नीट परीक्षेला (NEET) ला आपला पक्ष ठामपणे विरोध करत असल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

थलपती विजय नेमकं काय म्हणाले? (Thalapathy Vijay On Student Protest)

थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'नीट (NEET) परीक्षा लागू झाल्यापासून, केवळ त्या परीक्षेची विश्वासार्हता कमी झाली नाही, तर विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.'

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी

नीट (NEET) पूर्णपणे रद्द करावी : टीव्हीके (TVK On NEET)

टीव्हीके (TVK) नं म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षेमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना होणारं नुकसान कधीही न संपणारं आहे. त्यामुळे, आम्ही केंद्र सरकारकडे नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करतो.

राहुल गांधींच्या अटकेवर काय म्हणाले थलपती विजय? (Thalapathy Vijay On Rahul Gandhi)

पंतप्रधानांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत असताना राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं टीव्हीकेनं म्हटलंय. टीव्हीकेनं पुढे लिहिलंय की, "दिल्लीतील युवा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी फरफटत नेऊन हातकड्या घालणं, हा लोकशाहीच्या हक्कांवर झालेला एक हल्ला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे..."

सोमवारी नवी दिल्लीत हजारो विद्यार्थी, युवा संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांनी 'संसद मोर्चा'मध्ये सहभाग घेतला. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, नीट (NEET) वादामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची आणि परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली. या आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, बॅरिकेड्स उभारण्यात आले होते आणि आंदोलकांनी संसदेच्या दिशेनं कूच करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Bigg Boss Video Viral: 'बिग बॉस'मध्ये चाललंय काय? 2 स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, लाइव्ह शोमध्ये लिपलॉक अन्... होस्टने चांगलंच फटकारलं
'बिग बॉस'मध्ये चाललंय काय? 2 स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, लाइव्ह शोमध्ये लिपलॉक अन्... होस्टने चांगलंच फटकारलं

व्हिडीओ

Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Mumbai Local Train Central Railway: मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Embed widget