एक्स्प्लोर
Advertisement
शाहरूख खानच्या 'झीरो' विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
अभिनेता शाहरूख खान, सिनेमाच्या निर्मात्या गौरी खान आणि करूणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल. राय आणि रेड चिलीज प्रायव्हेट लिमिटेड आणि या सिनेमाला सर्टिफिकेट देणाऱ्या सीबीएफसीलाही प्रतिवादी करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : किंग खानचा आगामी सिनेमा 'झीरो' ला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमातील एका दृश्यात शाहरूखनं 'कृपाण' (छोटं शस्त्र) धारण केलं आहे. या प्रकारामुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. हायकोर्टातील एक वकील अमृतपालसिंह खालसा यांनी ही याचिका सादर केलीय. या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
याचिकेत अभिनेता शाहरूख खान, सिनेमाच्या निर्मात्या गौरी खान आणि करूणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल. राय आणि रेड चिलीज प्रायव्हेट लिमिटेड आणि या सिनेमाला सर्टिफिकेट देणाऱ्या सीबीएफसीलाही प्रतिवादी करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कृपाणचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठ आहे, तसेच शीख संस्कृतीत त्याला विशेष स्थान आहे. कुणीही ही कृपाण म्हणजेच छोटेखानी शस्त्र धारण करू शकत नाही. त्यासाठी काही धार्मिक विधी करून घेणं आवश्यक असतं, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
नुकतच या सिनेमाचं एक पोस्टरही लाँच करण्यात आलं. ज्यात चड्डी आणि बनियान घातलेला बुटका शाहरूख गळ्यात नोटांची माळ आणि अंगावर 'कृपाण' धारण केलेला दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हायकोर्टानं सीबीएफसीला निर्देश देत ही आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement