बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा जलवा; पठाण चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील
Pathaan Box Office Collection : पठाण (Pathaan) हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Pathaan Box office Collection Day 22 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Pathaan Box Office Collection: पठाण 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील
'पठाण'ने रिलीज झाल्यानंतर 22 व्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 502.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. पठाण हा वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये 1000 कोटींचा टप्पा पार करेल, असं देखील म्हटलं जात आहे. आता पठाण चित्रपट भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानं यशराज फिल्म्स मोठा निर्णय घेतला आहे.
Pathaan Box Office Collection ; यशराज फिल्म्सचा मोठा निर्णय
पठाण चित्रपट भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर यशराज फिल्म्सने या चित्रपटांच्या तिकीट दराबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शुक्रवारी (17 फेब्रुवारी) हा चित्रपट प्रेक्षकांना 110 रुपयांमध्ये बघता येणार आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस आणि आणखी काही या थिएटर्समध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट 110 रुपयांमध्ये पाहता येईल, अशी माहिती यशराज फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
View this post on Instagram
पठाण या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांमधील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शाहरुखने पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.
Pathaan Box Office Collection : शाहरुख खानचे आगामी चित्रपट
पठाणच्या यशानंतर शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आता पठाण प्रमाणेच शाहरुखच्या इतर आगामी चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच त्याच्या चाहत्यांना मिळेल.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: