Pathaan Box Office Day 16 : बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची कमाई सुरूच; जाणून घ्या 16 व्या दिवसाचं कलेक्शन
Pathaan Box Office Day 16 : शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करतोय. लवकरच हा चित्रपट 900 कोटींचा आकडा पार करणार आहे.
Pathaan Box Office Day 16 : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 16 दिवस झाले. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पठाण हा चित्रपट जगभरात कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. नुकतीच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. या सिनेमाने दोन आठवड्यात तब्बल 888 कोटींचा आकडा पार केला आहे.
या चित्रपटाने जगभरात अनेक कोटींची कमाई केली
शाहरुख खानच्या 'पठाण'चे परदेशी कलेक्शन $41.02 मिलियन आहे. त्याच्या हिंदी व्हर्जनने 442.50 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. तर, पठाणच्या डबिंग व्हर्जनची कमाई 16.40 कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 888 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. ज्यामध्ये भारतातील कमाई 551 कोटी रुपये आणि परदेशात 337 कोटी रुपये आहे.
शाहरुखच्या अॅक्शन लूकने चाहत्यांना घातली भुरळ
शाहरुख खानने पठाण चित्रपटात रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याची अॅक्शन आणि खतरनाक स्टंट सीक्वेन्स पाहून चाहते फार खुश झाले. खलनायकाच्या भूमिकेत जॉन अब्राहमने देखील चाहत्यांची मनं जिंकली. 'पठाण'मध्ये आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
शाहरुख खान 'जवान'मध्ये दिसणार
'पठाण' नंतर शाहरुख खान आता अॅक्शन-थ्रिलर चित्रपट जवानमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या शाहरूख व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी 'जवान'च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर पट्टी बांधलेली दिसत होती. या चित्रपटात विजय सेतुपती निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. 'जवान' (Jawaan) हा चित्रपट अॅटली यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी याआधी साऊथ इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमीळ, हिंदी, तेलूगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पठाणची स्टार कास्ट
पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :