एक्स्प्लोर

परवीन बाबीच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियाचा इंजिनीअर, भेटायला मुंबईत पोहोचला अन् बनला बॉलिवूडचा विलन

Parveen Babi Fan : बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने 'मर्द', 'कालिया' आणि 'मिस्टर इंडिया' अशा सूपरहिट चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

मुंबई : जिने 90 चं दशक गाजवलं, अशी बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबी (Actress Parveen Babi). अभिनेत्री परवीन बाबी त्या काळातील आघाडीच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक. परवीन बाबीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. परवीन बाबीचे देशातच नाही तर विदेशातही अनेक चाहते होते. ऑस्ट्रेलियामधील एक इंजिनीयर परनीवचा फोटो पाहून तिच्या प्रेमात पडला. परवीनला पाहण्याची आणि भेटण्याची इच्छा असलेला हा युवक मुंबईत आला आणि नंतर बॉलिवूडमधील नावाजलेला विलन बनला. 

परवीन बाबीच्या प्रेमात पडला ऑस्ट्रेलियाचा इंजिनीअर

90 च्या दशकात तुम्ही एका ब्रिटीश दिसणाऱ्या खलनायकाला नक्कीच पाहिलं असेल. या खलनायकाने 'मर्द', 'कालिया' आणि 'मिस्टर इंडिया' अशा सूपरहिट चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ही कहाणी आहे अभिनेते बॉब क्रिस्टो (Bob Christo) यांची. बॉब क्रिस्टो 90 च्या दशकात खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. बॉब क्रिस्टो ऑस्ट्रेलियाहून मस्कटसाठी निघाले होते, मात्र त्यांना व्हिसा न मिळाल्याने ते भारतात थांबले. एक दिवस त्यांची नजर परवीन बाबीचा फोटो असलेल्या मॅगझिनवर पडली. परवीनला पाहताच बॉब तिच्या प्रेमात पडला. यानंतर परवीनला भेटण्यासाठी बॉब थेट मुंबईत पोहोचला.

परवीनला भेटायला मुंबईत पोहोचला अन् बनला बॉलिवूडचा विलन 

बॉब क्रिस्टो याचं खरं नाव रॉबर्ट जॉन क्रिस्टो (Robert John Christo) ते मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी. त्यांचा जन्म 1938 मध्ये सिडनीत झाला. विश्व युद्ध 2 मध्ये त्यांचे आई-वडील जर्मनीला गेले, त्यानंतर आजी आणि आत्याने त्यांचं पालनपोषण केलं. बॉबला आधी नाटकाची आवड होती. त्यांनी काही वर्ष थिएटरमध्ये काम केलं, पण त्यांना त्यात करियर करता आलं नाही. त्यानंतर थिएटर सोडून त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करत इंजिनीयरिंगची पदवी मिळवली. थिएटर करत असताना त्यांची ओळख हेल्गासोबत झाली, तिच्यासोबत त्यांनी नंतर लग्न केलं. पण, कार अपघातात हेल्गाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी नरगिस नावाच्या दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. या दोघांना एक मुलगा झाला. 20 मार्च 2011 मध्ये बॉब क्रिस्टोचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

परवीन बाबीचा फोटो पाहून प्रेमात पडले

एकदा एका मुलाखतीत बॉब क्रिस्टो यांनी एका मुलाखतीत त्यांच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल रंजक गोष्ट शेअर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा त्यांनी एका मासिकाच्या कव्हर पेजवर परवीन बाबीचा फोटो पाहिला तेव्हा ते पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडले. यानंतर मला तिला भेटायचं होतं, त्यासाठी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांना चर्च गेटजवळ फिल्म युनिट भेटले. या युनिटमधील एक कॅमेरामन दुसऱ्या दिवशी 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटाच्या सेटवर परवीन बाबीला भेटणार होता, अशी माहिती त्यांना मिळाली. दुसऱ्या दिवशी बॉब त्याच्या मदतीने बॉब परवीनपर्यंत पोहोचला. तो कॅमेरामनशी परवीन बाबीबद्दल बोलत असताना अचानक मागून एका मुलीचा आवाज आला बॉबने मागे वळून पाहिलं तर तिथे परवीन बाबी होती. तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, तू परवीन बाबी नाहीस. मासिकातील फोटो दाखवत त्याने ही मुलगी परवीन बाबी असल्याचं सांगितलं.

बॉब-परवीनची मैत्री

बॉबचं हे बोलणं ऐकून परवीनला हसू आवरलं नाही आणि काही वेळ ती हसतच राहिली. मग ती थोडावेळ थांबली आणि म्हणाली, शूटिंगशिवाय मी कधीही मेकअप करत नाही. त्यानंतर हळूहळू दोघांची मैत्री झाली. काही काळानंतर बॉब क्रिस्टोचंही नाव परवीनसोबत जोडले गेलं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. नंतर बॉबला परवीनसोबत चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. सर्वात आधी संजय खानने 1980 मध्ये आलेल्या 'अब्दुल्ला' चित्रपटात बॉब क्रिस्टोला खलनायकाची भूमिका दिली. यानंतर त्यांनी 'कुर्बानी', 'कालिया', 'नास्तिक', 'मर्द', 'मिस्टर इंडिया', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'गुमराह' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Who is Radhika Merchant : सासू नीता अंबानीप्रमाणे शास्त्रीय नृत्यांगणा आहे सून राधिका मर्चंट, अनंतसोबतची पहिली भेट केव्हा झाली? वाचा दोघांची लव्ह स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu-kashmir Vidhansabha Rada :  ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर   विधानसभेत  कलम 370वरून राडाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Embed widget