(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : पंचतारांकित हॉटेल, वेडिंग मेन्यू ते नो फोन पॉलिसी; परिणीती-राघव यांच्या शाही विवाहसोहळ्याबद्दल एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही...
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा उद्या (24 सप्टेंबर) लग्नबंधनात अडकणार आहेत.
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय आहे. शाही विवाहासाठी दोघेही उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. पंजाबी आणि राजस्थानी परंपरेनुसार दोघांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा कुठे होणार? (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Details)
आपचे (AAP) खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी खूप विचार करून उदयपूरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयपूरमधील (Udaipur) 'द लीला पॅलेस' (The leela Palace) या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
परिणीती-राघवच्या लग्नात पाहुण्यांची वर्दळ (Parineeti Chopra Raghav Chadha Guest List)
मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, छत्तीसगड आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि अशोक गहलोत उपस्थित राहणार आहेत. तसेच परिणीतीची बहीण ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रादेखील हजेरी लावणार आहे. अनेक राजकीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत राघव-परिणीती लग्नबंधनात अडकणार आहेत.
परिणीती-राघव यांचा आऊटफिट खास (Parineeti Chopra Raghav Chadha Bride Groom Dress)
परिणीती चोप्राचा लग्नसोहळ्यातील आऊटफिट डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केला आहे. तर राघव चड्ढा यांचा आऊटफिट मामा पवन सचदेवा यांनी डिझाईन केला आहे.
परिणीती-राघव कोणत्या पद्धतीने लग्न करणार? (Parineeti-Raghav Wedding Update)
परिणीती आणि राघव पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत.
परिणीती-राघवच्या लग्नात पदार्थांची मेजवानी (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Food Menu)
परिणीती-राघव यांच्या लग्नाचा मेन्यू खूप खास असणार आहे. छोले भटूरे, पराठा, दाल मखनी, सरसों का साग आणि मक्के की रोटी, मलाई लस्सी, डिमसम, मिठाई अशा अनेक पंजाबी पदार्थांची मेजवानी परिणीती-राघव यांच्या लग्नसोहळ्यात असणार आहे.
नो फोन पॉलिसी (No Phone Policy)
परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसी असणार आहे. दोघांनाही त्यांचं लग्न प्राइव्हेट ठेवायचं आहे त्यामुळे त्यांनी या पॉलिसीचा अवलंब केला आहे. परिणीती आणि राघव यांचे आज प्री-वेडिंग फंक्शन होणार आहेत. तर 24 सप्टेंबरला त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडेल.
संबंधित बातम्या